Saturday, May 18, 2024

Latest Posts

मुंबईतील अंधेरी पूर्व भागात इमारतीवर कोसळली दरड

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील समोर येत आहेत

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. काल मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर देखील दरड कोसळल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच यापूर्वी खालापूर रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून दुर्घटना झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील अंधेरी पूर्व भागात घरावर दरड कोसळली आहे.रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दरड दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरामधून सोसायटीच्या पहिला मजल्यावरील चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या ढिगारा गेला. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अंधेरी चकाला रामबाग सोसायटीत २३ वर्षे जुनी आहे. या इमारतीमध्ये रात्री दरड दुर्घटना घडली आहे. रात्री दोन वाजता बॉम्ब ब्लास्ट होतो अगदी त्याप्रमाणे आवाज आला. इमारतीमध्ये रहिवासी झोपेत असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. इमारतीच्या बाजूला असलेल्या डोंगराचा एक भाग कोसळून इमारतीच्या भिंती तोडून दगड घरामध्ये शिरले आहेत. त्यामुळं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच घरांमध्ये माती शिरली आहे. सध्या या घटनांमुळं इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.दरम्यान सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र ५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य करून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.

या दरड दुर्घटनेमध्ये पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत आहे. यामुळं इमारतीच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरड दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे जवान घटना स्थळावर दाखल झाले. सध्या लोकांना इमारतीच्या बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

 

Latest Posts

Don't Miss