Friday, May 17, 2024

Latest Posts

Maha Patrakar Parishad Live, अनिल परब यांनी राहुल नार्वेकरांवर केली टीका, म्हणाले…

दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी निकाल दिला.

Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live :

दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी निकाल दिला. याविरोधात उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. आज उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. यामध्ये कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी संबोधित केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी संबोधित केले आहे.यावेळी बोलत असताना अनिल परब यांनी सर्व ठराव हे स्पष्ट करून सांगितले आहेत. तर ठाकरे गटाकडून २०१८ च्या कार्यकारणीचा व्हिडीओ हा दाखवण्यात आला आहे.

यावेळी बोलत असताना अनिल परब म्हणाले आहेत की, गेले दिड वर्ष या अपात्रतेची सुनावणी ही सुप्रीम कोर्टात चालू होती. मी स्वतः आणि अनिल देसाई या सर्व प्रकरणात शिवसेनेच्या नायायालयीन लढाई लढणाऱ्या सर्व वकिलांना मदत करत होतो. यावेळी आपले वकील कपिल सिब्बल हे आपली बाजू मांडत होते आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे देशातील सर्व लोकांना असं वाटत होत की यांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे देशातील गद्दरांची ही कंपनी डिस्कॉलिफाय होईल. अश्या प्रकारचं मत त्यावेळीस तयार झाले होते. निवडणूक आयोग्याने मागितलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. निकाल देताना सर्व निकष तपासले नाहीत अस देखील अनिल परब म्हणाले आहेत. २०१३ च्या कार्यकारिणीत पक्ष घटना दुरुस्तीचे ठराव हे मांडले होते. शिवसेना प्रमुख कुणालाही होता येणार नाही, हा पाहिला ठराव होता अस देखील अनिल परब हे म्हणाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद तयार केल, असा दुसरा ठराव होता. कार्यकारी अध्यक्ष पद रद्द करण्यात आल हा तिसरा ठराव बनवण्यात आला. हे सर्व पुरावे राहुल नार्वेकर यांच्याकडे दिले होते अस देखील अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. तर पुढे ठाकरे गटाकडून २०१८ च्या कार्यकारणीचा व्हिडीओ हा दाखवण्यात आला आहे. तसेच २०१३ आणि २०१८ ची कागदपत्र आयोगाला दिली होती

१९९९ च्या नंतर आमच्याकडे रेकॉर्डवर शिवसेनेची कोणतीही घटना नाही. त्यामुळे १९९९ ची घटना तुमची शेवटची घटना आहे. त्या घटनेत सर्वोच्च अधिकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होते. त्यानंतर अधिकार कुणाला दिल्याची नोंद आमच्याकडे नाही. आता बाळासाहेब ठाकरे नसल्यामुळे विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे, असे समजून पक्ष आणि चिन्ह काढून घेतली. निवडणूक आयोगाच्या निकालाची पुनरावर्ती आपल्या निकालात केली आहे. निवडणूक आयोगात केस सुरु होती, त्यावेळी निवडणूक आयोगाने ज्या गोष्टी मागतल्या, त्याची पूर्तता आम्ही केली. त्यांचा खोटेपणा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा… कारण, सगळीकडे पुरावे देऊनही निकाल विरोधात येतोय. त्यामुळे लोकांना काय झालं ते लोकांना समजून सांगावे लागेल. असे म्हणत अनिल परब यांनी सर्व पुरावे दाखवले.

नेमकं प्रकरण काय आहे ?

दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी निकाल दिला. याविरोधात उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. आज उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. ठाकरे गटाकडून या महापत्रकार परिषदेचा टीझर जारी करण्यात आला आहे. तसेच वरळी भागात ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या महा पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत, अंबादास दानवे, सचिन अहिर यांच्यासह ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. आज उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष हे लागले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि कायदेतज्ज्ञ असिम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे उपस्थित होते.

 

Latest Posts

Don't Miss