Thursday, May 16, 2024

Latest Posts

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात

आज पहाटे ५ वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात कार आणि लग्झरी बसमध्ये जोरदार धडक झाल्याने झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही कार गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळेस कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक दिली आणि हा अपघात घडला आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर हा अपघात घडलाआहे.

आज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) कार आणि लग्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाचे नियंत्रण सुटल आणि त्यानंतर कारची लग्झरी बसला धडक बसली. ही कार गुजरातहून मुंबईकडे येत होती. यावेळेस कारचा वेग हा जास्त असल्यामुळे चालकाला कारवार नियंत्रण ठेवता आले नाही आणि ही कार विरुद्ध दिशेनं येणाऱ्या लग्झरी बसवर धडकली. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे होते. तर घडलेला अपघाती इतका भीषण होता की कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. आणि बसमधील तीन प्रवासी अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना कसा कासा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं गुजरात लेनवर जाऊन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लग्झरी बसनं समोरासमोर ठोकर मारल्यानं हा अपघात झाला.सदर अपघातादरम्यान कारमध्ये चार प्रवासी उपस्थित होते. अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद अब्दुल सलाम हाफिसजी, इब्राहिम दाऊद, आसिया बेन कलेक्टर, इस्माईल महंमद देसाय, अशी अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. तर लग्झरीमधील तीन प्रवाशांना अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे.’

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक या अपघातानंतर काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व माहिती घेऊन वाहतूक तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Latest Posts

Don't Miss