Sunday, May 19, 2024

Latest Posts

अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर लाँन्च, १५ फेब्रुवारी पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता

अंधेरी पूर्व- पश्चिमेला (Andheri East- West) जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचा (Andheri Gokhale Bridge) पहिला गर्डर बसवण्याचे काम शनिवारी मध्यरात्री करण्यात आले आहे.

अंधेरी पूर्व- पश्चिमेला (Andheri East- West) जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचा (Andheri Gokhale Bridge) पहिला गर्डर बसवण्याचे काम शनिवारी मध्यरात्री करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या उत्साहात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जय श्रीरामचे नारे देत एकमेकांचे अभिनंद करत शुभेच्छा दिल्या. या पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

गोखले पूल हा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीतील एक महत्त्वाचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल आहे. मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री गोखले पुलाच्या गर्डर्सची ट्रायल रन यशस्वी झाल्यामुळे शनिवारी मध्यरात्री गर्डर बसवण्याचे काम करण्यासाठी चार तासांचा विशेष मेगाब्लॉक घेला होता. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा गर्डर यशस्वी लॉन्च करण्यात आला आहे. गोखले ब्रिजच्या निर्मितीसाठी ओपन वेब गर्डर बसवण्यात आला आहे. हा संपूर्ण गर्डर ९० मीटर लांबीचा पूल साडेतेरा मीटर रुंद आहे आणि सुमारे १३०० टन वजनी गर्डरची उभारणी करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि गर्डर सरकवल्यानंतर तो ७.५मीटर खाली आणणे आदी कामे करावी लागणार आहेत. पहिल्या गर्डरच्या कामाची जबाबदारी रेल्‍वे मंत्रालयाच्‍या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमावर सोपवण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण करण्याचे बीएमसीचे उद्दिष्ट आहे. या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. गर्डर बसवल्यानंतर त्यावर काम करून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. नंतर अन्य कामे पूर्ण केली जाणार आहेत. या पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षात गोखले पूलची एक मार्गीका नागरिकांसाठी खुली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचा पहिला गर्डर स्थापन करण्यासह पुलाच्या इतर कामांची प्रगती जाणून घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देवून पाहणी केली होती. गोखले पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणताही विलंब होवू नये, तसेच अवाढव्य गर्डर स्थापन करण्याची सगळी कामे महानगरपालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून अचूकपणे पार पडावीत, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि त्यांची प्रशासन प्रारंभापासून प्रयत्न करीत आहे.

हे ही वाचा:

आज आत्मनिर्भर भारताचा विजय झाला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

MUMBAI: मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील विविध भागांची पाहणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss