MUMBAI: गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

अनेक कलारत्नांचे, महापुरुषांचे, थोर संतांचे स्मारक किंवा त्यांची नावे चौकांना किंवा रस्त्यांना देण्यात येतात. परंतु, शहरात येणाऱ्या पर्यटकांना किंवा नवीन पिढीला त्यांच्याबाबत योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे पुतळ्याबद्दल कोणाला योग्य ती माहिती मिळत नाही.

MUMBAI: गिरगावात पहिला क्यूआर कोड चौक, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुंबईमधील गिरगाव गावदेवी परिसरातील एका चौकाला संगीतरत्न सुधीर फडके यांचे नाव देण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला हा मुंबईतील पहिला क्यूआर कोड आहे. या पहिल्या क्यूआर कोड चौकाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या उद्घाटनाच्या सोहळ्याला ज्येष्ठ गायक आणि संगीतकार स्वर्गीय सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके गीतरामायणाचा कार्यक्रम सादर झाला. संगीतप्रेमींसाठी ही अनोखी मेजवानी ठरली. संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या अजरामर गीतांची जादू आजही कायम आहे. त्यांच्या गाण्यांची ओढ जुन्या पिढीला आहे. परंतु, ती ओळख परदेशी पर्यटक आणि नवीन पिढीला व्हावी, यासाठी मुंबईत गिरगावात पहिला आगळा वेगळा उपक्रम राबविला गेला. मुंबईतील पहिल्या ‘क्यूआर’ कोड चौकाचा फलकाचे अनावरण मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

अनेक कलारत्नांचे, महापुरुषांचे, थोर संतांचे स्मारक किंवा त्यांची नावे चौकांना किंवा रस्त्यांना देण्यात येतात. परंतु, शहरात येणाऱ्या पर्यटकांना किंवा नवीन पिढीला त्यांच्याबाबत योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे पुतळ्याबद्दल कोणाला योग्य ती माहिती मिळत नाही. पुतळा कोणाचा आहे? त्यांचे नाव किंवा कार्य याबद्दल काहीच माहिती नसते. त्यावेळी त्यांची माहीती मिळण्यास विलंब होतो. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून गावदेवीत ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांचे नाव एका चौकाला दिले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा नवीन व्यक्तीला नामफलकावर लावलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करताच गायक सुधीर फडके यांच्या जीवनकार्याची माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

मुंबईमध्ये येणारे अनेक पर्यटक तसेच नवीन व्यक्तींना नाम फलकावर असलेला ‘क्यूआर कोड’ आपल्या मोबाईलने स्कॅन केल्याने त्यांच्याबद्दलची सर्व माहिती मिळायला मदत मिळणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून अशा पद्धतीच्या पहिल्या ‘क्यूआर कोड’ नाम फलकाचे अनावरण गिरगावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

हे ही वाचा:

ENTERTAINMENT: कोलंबिया युनिव्हर्सिटीत होणार ‘चैत्यभूमी’ माहितीपटाचे प्रदर्शन

हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारी अळीवाची खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version