Sunday, May 19, 2024

Latest Posts

हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारी अळीवाची खीर

हिवाळ्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. त्यामध्ये मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू यासारखे पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. हिवाळ्यामध्ये अळीवच्या बियांची खीर बनवली जाते. अळीवच्या बियांना काही वेळा हलीम देखील बोले जाते. बाळंपणात अथवा थंडीच्या दिवसांमध्ये अळीवचे लाडू काही घरांमध्ये बनवले जातात. या बियांमुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये अळीवाच्या बियांचा समावेश केला जातो.याच्यामुळे शरीर डिटॉक्स राहते. अळीवमध्ये भरपूर पोषक घटक असतात. या बिया लालसर रंगाच्या आणि अंडाकार आकाराच्या असतात. अळीवाच्या बिया खाल्याने त्वचा रोग दूर होतो. चला तर पाहुयात अळीवाच्या खिरीची रेसिपी

साहित्य

अर्धा वाटी अळीव १ वाटी दूध खारीक, बदाम अर्धा वाटी साखर वेलची पावडर

कृती:

सर्वप्रथम अळीवाची खीर बनवण्यासाठी अळीवाच्या बिया पाव कप दुधात भिजत ठेवा. त्यानंतर बदाम आणि खारीक पावडर वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावी. हे सर्व दोन तास तरी भिजून द्यावे. दोन तासानंतर अळीव चांगले फुलून येतात. त्यानंतर एका कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवावे. दुध चांगले उकळल्यानंतर त्यात भिजवलेल्या अळीवाच्या बिया टाकाव्यात. बिया टाकून झाल्यानंतर मध्यम आचेवर नीट शिजवून घ्यावे. बिया काही प्रमाणात शिजल्यानंतर त्यात साखर टाकावी. साखर विरघल्यानंतर आवडीनुसार पिस्ता, काजू आणि खारीक घालून घ्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार वेलची पावडर टाकून घ्यावी. तयार आहे अळीवाची खीर.

हे ही वाचा:

‘कॉफी विथ करण ८’ या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी सहभागी डायबिटीज पेशंटनी आहारात करा या पदार्थांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss