Sunday, May 19, 2024

Latest Posts

ENTERTAINMENT: कोलंबिया युनिव्हर्सिटीत होणार ‘चैत्यभूमी’ माहितीपटाचे प्रदर्शन

विशेषतः या दिवसाचा सन्मान करण्यासाठी भीम अनुयायी कसे एकत्र येतात आणि त्यांची ओळख आणि सशक्तीकरण यावर त्याचा राजकीय परिणाम काय होतो हे तपासण्यात आले आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR. BABASAHEB AMBEDKAR) यांच्या ६ डिसेंबर रोजी असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ३ डिसेंबर २०२३ रोजी ‘चैत्यभूमी’ या माहितीपटाच्या प्रदर्शन केले जाणार आहे. सोमनाथ वाघमारे यांनी दिग्दर्शन केलेल्या माहितीपटाच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रदर्शन करण्यात येणार आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील इन्स्टिटयूट फॉर कॅम्पाराटीव्ह सोसायटी अँड लिटरेचर (Institute for Comparative Society and Literature) या विभागाकडून या माहितीपटाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून समाजशास्त्र या विषयात पदवी घेतली असून पुणे विद्यापीठातून मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज मध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथून त्यांनी पूर्ण केले आहे. ते सध्या टीसमध्ये पीएचडी स्कॉलर आहेत आणि त्यांच्या प्रबंधांचा विषय ‘महाराष्ट्रातील जात, चित्रपट आणि सांस्कृतिक राजकारण’ मराठी चित्रपटांचा अभ्यास असा आहे.

याआधी याच ठिकाणी फॅन्ड्री या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी चैत्यभूमी या माहितीपटाचे प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित केले आहे. या माहितीपटाचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेच्या ‘मीडिया आणि कम्युनिकेशन’ विभागाकडून करण्यात आलं होतं. तसेच युकेमधील अनेक दिग्दर्शक संस्थांमध्येही याचं प्रदर्शन झाले असून २३ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चैत्यभूमी या माहितीपटाचे दिग्दर्शन सोमनाथ वाघमारे यांनी केले आहे आणि तमिळ चित्रपट निर्माते रणजीत यांच्या नीलम प्रोडक्शनने हे प्रस्तुत केले आहे. हा संगीतमय चित्रपट मुंबईतील चैत्यभूमीच्या स्मरण उत्सवाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकणारा आहे.

भारतातील दलित चळवळीसाठी एक महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या चैत्यभूमीला सहा डिसेंबर १९५६ रोजी झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम संस्कारांशी जोडल्यामुळे या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन जातीय दडपशाहीचा मुकाबला करण्यासाठी आणि परिवर्तनवादी बदल घडवून आणण्यासाठी समर्पित केले. शोषितांसाठी दिशादर्शक म्हणून कार्य केले. संपूर्ण आयुष्यभर भेदभाव पूर्ण अडथळे दूर केले. व्यक्तींना समाजात त्यांचा सन्मान आणि योग्य स्थान पुन्हा प्राप्त करण्यास सक्षम केले. या माहितीपटात समकालीन भारतातील या सार्वजनिक कार्यक्रमाच्या प्रासंगतेचा शोध घेऊन असंख्य लोक हा दिवस कोणत्या मार्गाने पाळतात हे दाखवण्याचे काम करण्यात आले आहे. विशेषतः या दिवसाचा सन्मान करण्यासाठी भीम अनुयायी कसे एकत्र येतात आणि त्यांची ओळख आणि सशक्तीकरण यावर त्याचा राजकीय परिणाम काय होतो हे तपासण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘कॉफी विथ करण ८’ या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी सहभागी

अद्वय हिरेंनंतर मोठे बंधू अपूर्व यांच्यावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss