Sunday, May 19, 2024

Latest Posts

MUMBAI: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा शुभारंभ

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे त्याप्रमाणे रोजगार देणारे हात तयार करण्याची गरज आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा शुभारंभ आज राजभवन (Rajbhavan) येथे करण्यात आला. यावेळी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) हे देखील उपस्थित होते. राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने राज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासोबत दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा-२ या उपक्रमांचा देखील आज शुभारंभ करण्यात आला.

शालेय शिक्षण विभागात आपण अनेक बदल केले आहेत. शाळांमध्ये चांगल्या सुविधा असतील तर त्या मुलांना आवडतात. आमच्या काळातील शाळा आणि आत्ताच्या शाळा मध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. संस्कार करणाऱ्या शाळा राज्यात उभारण्याची गरज असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM NARENDRA MODI) यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ सारखा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती घालवण्यासाठी पुढाकार घेतला होता. याचाच अर्थ देशात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (BALASAHEB THACKERAY) म्हणायचे त्याप्रमाणे रोजगार देणारे हात तयार करण्याची गरज आहे. राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून याचे सकारात्मक परिणाम नक्की दिसून येतील अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल रमेश बैस (GOVERNOR RAMESH BAIS), शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपटातील लूक प्रदर्शित

DR. AMBEDKAR यांचा महापरिनिर्वाणाच्या आधीचा दिवस कसा होता?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss