Saturday, May 18, 2024

Latest Posts

टोमॅटोचे भाव स्थिरावले मात्र , भाज्यांचे दर वाढणार

बाजारात आवक घटल्याने गेल्या आठवड्याभरापासून भाजीपाला महागला आहे. दरम्यान मे आणि जुन महिन्यात उन्हामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

बाजारात आवक घटल्याने गेल्या आठवड्याभरापासून भाजीपाला महागला आहे. दरम्यान मे आणि जुन महिन्यात उन्हामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यात अचानक पाणी आटल्याने अनेक पिके पाण्याअभावी जळाली. आता पाऊस सुरु झाल्याने देखील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातही टोमॅटो (Tomato) पेट्रोलपेक्षाही महाग झाले आहेत.

सध्या बाजारात कोणतीही भाजी ५० रुपये किलोच्या खाली मिळत नाही आहे. तर टोमॅटोचे दर हे १०० रुपये किलोच्या पुढे आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत किलोमागे ४० रुपयांची वाढ झाल्याने शहरात टोमॅटो प्रतिकिलो १४० रुपये दराने विक्री होत आहेत. हा उच्चांक असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.मान्सून लांबला तरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कधी रिपरीप तर कधी जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे टोमॅटो पिकांचे नुकसान झाले. याचा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याने बाजारात टोमॅटोचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र आता बाजारामध्ये असे देखील बोलले जात आहे अति पाऊस झाला तर भाजीपाल्याचे दर देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपासून टोमॅटोचे दर हे गगनाला भिडले आहेत, किरकोळ बाजारात तर १५० ते २०० किलो रुपयांनी टोमॅटो विकला जायचा, आता मात्र काही प्रमाणात टोमॅटोचे दर हे स्थिरावले असून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या ८० ते १०० किलो रुपयांनी टोमॅटो विकला जातो, त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, तर खरेदीसाठी ग्राहक येत असल्याने व्यापाऱ्यांचा धंदा देखील होत आहे, मात्र पुढील काही महिने भाज्यांचे दर हे कमी जास्त होत राहणार असल्याचं भाजी विक्रेत्यांनी सांगितलं. तसेच नवी मुंबई बाजार समितीमधून देखील आच सूर बघायला मिळत आहे.

हे ही वाचा:

पावसाळ्यात फिरायला जायचा बेत करताय, या गोष्टी तुमच्यासोबत असायलाच हव्या.

अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss