Monday, May 20, 2024

Latest Posts

मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद

मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज मराठवाड्यात पार पडली.

मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज मराठवाड्यात पार पडली. या बैठकीत तब्बल ३५ हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काय-काय निर्णय घेण्यात आले, मराठवाड्यासाठी काय-काय मोठे निर्णय घेण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्याच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. जलसंपदा आणि सिंचन विभागासाठी निर्णय घेतलाय. प्रस्तावित माती धरणांऐवजी सिमिटने बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. निम्म दुधना प्रकल्प, सेलू परभणी, पैनगंगा प्रकल्प पूसद, जोड परळी उंच पातळी बंधारा, मदारा उच्च पातळी बंधारा, वैजापूर, बाबळी मध्य प्रकल्प, वाकोद मध्य प्रकल्प, वंकेश्वर उच्च पातळी बंधारा असा एकूण १४ हजार कोटी रुपयांचा सिंचन प्रकल्पावर खर्च करण्याचा निर्णय घेतलाय”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींचा निर्णय झालेला आहे. नदीजोडचे १४ हजार कोटी रुपये वगळून ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम वाहिणी नद्यांद्वारे समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत निर्णय घेतला. दमणगंगा-वैतारणा-गोदावरी प्रमुख उपसा वळण योजना, दमणगंगा एकदरे गोदावरी आणि पार गोदावरी यावर १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सार्वजनिक विभागामध्ये १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख रुपये, पशू संवर्धन, दुग्ध विकास, मत्स व्यवसायासाठी ३ हजार ३१८ कोटी ५४ लाख, नियोजन १ हजार ६०८ कोटी २८ लाख, परिवहनवर १ हजार १२८ कोटी ६९ लाख, ग्रामविकासवर १ हजार २९१ कोटी, कृषी विभाग ७०९ कोटी, क्रीडा विभाग ६९६ कोटी, गृह विभाग ६८४ कोटी, वैद्यकीय शिक्षण ४८८ कोटी, महिला आणि बालविकास विभाग ३८६ कोटींची तरदूद केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शालेय शिक्षण ४९० कोटी, सार्वजनिक आरोग्य ३५ कोटी, सामान्य प्रशासन २८७ कोटी, नगरविकास २८१ कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग २५३ कोटीस, पर्यटन ९५ कोटी, मदत-पुनर्वसन ८८ कोटी, वनविभाग ६५ कोटी, महसूल विभाग ६३ कोटी, उद्योग विभाग ३८ कोटी, वस्त्रोद्योग २५ विभाग कोटी, कौशल्य विकास १० कोटी, विधी आणि न्याय ३ कोटी ८५ लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेतलाय”, असं मुख्यनमंत्र्यांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठण आणि तीन नद्यांवरचे पूल याबाबतही निर्णय घेतला. त्याचबरोबर सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय, धाराविशमध्ये वैद्यकीय शिक्षण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन घेणं याबाबतचे निर्णय घेतले आहेत”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे ही वाचा: 

उज्ज्वला ते तिहेरी तलाक… मोदी सरकारने महिलांबाबत घेतले हे मोठे निर्णय

दहशतवाद्याच्या हत्येनं भारत कॅनडात तणाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss