बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात राडा; कार्यकर्ते आक्रमक

बारामती(Baramati) नगरपरिषदेच्या समोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार घोषणाबाजी सुरु झाली.बारामती लोकसभा(Baramati Loksabha) मतदारसंघातील लढाई ही किती चुरसीने लढली जात असल्याचे चित्र दिसत आहे.पोलिस प्रशासन कार्यकर्त्यांना शांततेचे आव्हान करत आहेत. 

बारामतीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात राडा; कार्यकर्ते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारसभेची आज सांगता होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) सर्व नेत्यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहेत. त्यातच प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज दोन्ही पवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी असल्याने आज प्रचारसभेची तोफ थंडावणार आहे.महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra pawar) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे(Supriya sule) यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार(Sharad pawar) यांची बारामती मध्ये प्रचार सभा पार पडणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते प्रचारसभेत मोठ्यासंख्येने उपस्थित राहत आहेत. यातच आज बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची रॅली निघाली असताना समोरुन अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

बारामती(Baramati) नगरपरिषदेच्या समोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार घोषणाबाजी सुरु झाली.बारामती लोकसभा(Baramati Loksabha) मतदारसंघातील लढाई ही किती चुरसीने लढली जात असल्याचे चित्र दिसत आहे.पोलिस प्रशासन कार्यकर्त्यांना शांततेचे आव्हान करत आहेत.

दरम्यान, बारामती मध्ये पहिल्यांदाचा पवार कुटुंब एकमेकांविरोधात उतरल्याने पवार विरुद्ध पवार हे समीकरण चांगलेचं रंगत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra pawar) आणि शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे(Supriya sule) असा सामना बारामतीत होत असल्याने दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोपप्रत्योरोप करत आहेत. सुप्रिया सुळेंसाठी संपुर्ण पवार कुटुंब प्रचाराच्या मैदानात उतरल्याने अजित पवार देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे बारामतीतील ही लढाई अतिरंगत होणार.

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

PM Narendra Modi जीवन हे एका खुल्या पुस्तकासारख आहे – Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version