Saturday, May 18, 2024

Latest Posts

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

नारायण राणेंना माझी आणि प्रचाराचा गरज नाही ते निवडणून आलेलेच आहेत.मी सरळ चालणारा माणुस आहे. मला एखादी गोष्ट पटली तर ती शेवटपर्यंत पटतेच"

आज महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.राज ठाकरे यांच्यासह मनसेतील आमदार राजू पाटील(Rajupatil ), मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव(Avinash jadhav), बाळा नांदगावकर (bala nandgaonkar), नितीन सरदेसाई (Nitin sardesai) अनेक नेते या प्रचार सभेत उपस्थित आहेत.राज ठाकरे यांनी प्रचार सभेत उपस्थित राहताच “शब्द द्यावा आणि तो पुर्ण करावा त्याला म्हणतात राज ठाकरे”असे म्हणत नारायण राणेंनी राज ठाकरेंची स्तुती केली.

“जुने सहकारी मित्र” असे नारायण राणेंना संबोधित करत प्रचार सभेला सुरुवात करत गुढीपाडव्याच्या मेळाव्यात जेव्हा पाठींबा दिला तेव्हा मनात नव्हत की कुठे सभा घ्यावा लागतील पण नारायण राणेंचा फोन आल्यावर त्यांना नाही म्हणु शकलो नाही. नारायण राणेंना माझी आणि प्रचाराचा गरज नाही ते निवडणून आलेलेच आहेत.मी सरळ चालणारा माणुस आहे. मला एखादी गोष्ट पटली तर ती शेवटपर्यंत पटतेच”. असे म्हणाले.

प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr modi ) यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी काश्मीरमधून ३७० कलम रद्द केलं हे आताच्या सरकारमुळे झालं हे मान्य करावचं लागेल. मोदींचं सरकार आल्यावर राम लल्लाचं मंदिर झालं. मोदींच सरकार आणि सुप्रिमकोर्ट यांच्यामुळे आज रामलल्लाचं मंदिर बनलं.२०१९ मी जे बोललो ते विरोधी पक्षांची हिम्मत नाही बोलायची. मला भुमिका नाही पटली म्हणुन मी विरोधात होतो. २०१४ ते २०१९ पर्यंत केंद्रीय मंत्र्यांकडून,नरेंद्रमोदींकडून काही गोष्टी झाल्या त्या नाही पटल्या त्या आजही पटत नाही. पण ज्या गोष्टी पटल्या त्यांचं कौतुक देखील करतो.”

काल उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackeray) कोकण दौरा होता त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली त्यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, “अडीच अडीच वर्षांच बिगाड होत. जर भाजपने मान्य केलं असतं तर त्यांनी आज हे बोलले असते का? आपण का विरोध करतो हे माहित नाही परंतु विरोध आहे.”प्रकल्प आले की त्यांचा खासदार जाऊन विरोध करणार. प्रकल्पाचं नवीन जन्म घालायचं असेल तर त्यांचा “बारसू “घालावा लागतो. साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होतं तेव्हा उद्योग धंदे का बाहेर गेले? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला.

दरम्यान, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असा मला आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता,”माणुसकी जोपासणारे, दिलेला शब्द पाळणं, एखाजा विषय जनतेला समजून सांगायचा, विषयाला न्याय देण्याचं काम म्हणजे राज ठाकरे आणि दुसरे विकृती असलेला माणुस म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. स्वत:च्या खात्यातून एक रुपये दे.दम द्यायचं काम तुमचं नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.”

हे ही वाचा: Rohit Vemula प्रकरणामुळे Prakash Ambedkar यांचे Congress वर ताशेरे

माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, यांच्यासारखा चिंधीचोर नाही, Kalyan Kale यांची Raosaheb Danve यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss