Monday, May 20, 2024

Latest Posts

सुप्रीम कोर्ट करणार नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार

ठाकरे गटाने केलेल्या विनंतीवरून या खटल्याची दखल घेण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या अनुषंगाने देशाच्या राजकारणासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असणार आहे.

राज्यभराच्या सत्ता संघर्षात महत्त्वाचा मुद्दा असलेल्या नबाम रेबियाच्या केसचा पुनर्विचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. ७ न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर १२ ऑक्टोबरला या केसला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाने केलेल्या विनंतीवरून या खटल्याची दखल घेण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या अनुषंगाने देशाच्या राजकारणासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने २०१६ मधील रेबिया प्रकरणाचा निर्णय ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला होता. ठाकरे गटाकडून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीच्यावेळी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवावे, अशी मागणी करण्यात आली होती.

हे ही वाचा: 

मराठा आरक्षण समिती आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss