Gudi Padwa 2023, डोंबिवलीतील शोभायात्रेत CM शिंदेंची उपस्थिती,’आमचा पर्सनल अजेंडा…’

आज सर्वत्र राज्यभरात गुढी पाडव्याचा मोठा उत्साह दिसून येत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्राचे आयोजन हे करण्यात आलं आहे.

Gudi Padwa 2023, डोंबिवलीतील शोभायात्रेत CM शिंदेंची उपस्थिती,’आमचा पर्सनल अजेंडा…’

आज सर्वत्र राज्यभरात गुढी पाडव्याचा मोठा उत्साह दिसून येत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्राचे आयोजन हे करण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे डोंबिवलीमध्ये देखील या शोभायात्रेचे आयोजन हे करण्यात आलं आहे. सकाळी डोंबिवलीतही पाडव्याची शोभायात्रा निघाली. येथे यामध्ये पारंपारिक वेशभुषेत अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सरकारची इच्छा नेमकी काय आहे हे देखील सांगितलं.

तसेच यावेळी गुढी पाडव्याच्या निम्मिताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या राज्यात गेल्या सात आठ महिन्यात आम्ही जे निर्णय घेतले ते पाहिले तर एवढे धाडसी निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. नुकताच आपला आर्थिक अर्थसंकल्प पार पडला. यामध्ये देखील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, तरुण, महिला यांचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला. लेक लाडकी ही सर्वात लोकप्रिय योजना आपण सुरु केली. एसटीत पन्नास टक्के सवलत देऊन टाकली. ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास दिला, कलाकारांसाठी निर्णय घेतले. कलाकारांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभं आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “स्वागत यात्रेत आपण मोठा उत्साह पाहिला, आमचं सरकार आल्यापासून सर्व सण प्रचंड उत्साहात साजरे झाले. आता गुढी पाडवा देखील उत्साहात साजरा झाला. राज्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर आपली सांस्कृतीक भूकही असते त्यासाठी आपले सण उत्सव, परंपरा आपण जोपासली पाहिजे. यासाठी हे सण उत्सव आवश्यक आहेत. त्यामुळं तुमच्या सर्वसामान्यांच्या सरकारनं सर्व निर्बंध काढून टाकले”

हे ही वाचा : 

शिवाजी पार्कवर झळकले राज ठाकरेंचे बॅनर, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री…

Gudi Padwa2023, थेरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त उभारलेली गुढी सात दिवस डौलाने फडकवितात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version