Tuesday, May 7, 2024

Latest Posts

शिवाजी पार्कवर झळकले राज ठाकरेंचे बॅनर, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री…

आज गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आज गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचा मेळावा हा आयोजित करण्यात येतो. तसेच या निमित्ताने शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करत ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न हा करण्यात आलं आहे.

आज संध्याकाळी राज ठाकरे यांची सभा आहे. आणि या सभेनिम्मित शिवाजी पार्क परिसरात जोडणे बॅनरबाजी ही करण्यात आली आहे. या सर्व बॅनर वर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा आशय हा लिहिण्यात आला आहे. शिवसेना भवनासमोर हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे जणू काही मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न हा केला आहे.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जय्यत तयारी ही करण्यात आली आहे. राज ठाकरेंची यांची ही अवघ्या काही तासात धडाडणार आहे. आज राज ठाकरे हे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे लागले आहे. तसेच या सभेसाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून जवळपास २५ हजार लोकांसह ३५० बसेस आणि १५०० कार चाकी गाड्या शिवतिर्थावर जाणार आहेत अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.

नुकताच मनसेचा वर्धापन दिन हा दि ९ मार्च रोजी पार पडला. या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणं टाळलं होतं. पण आज गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण सविस्तर राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे. तसेच राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे. टिझरमध्ये हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असे म्हटले आहे.

हे ही वाचा : 

Gudi Padwa2023, थेरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त उभारलेली गुढी सात दिवस डौलाने फडकवितात

Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss