Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Gudi Padwa2023, थेरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त उभारलेली गुढी सात दिवस डौलाने फडकवितात

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त वेगवेगळ्या परंपरा देखील आपल्याला पाहायला मिळतात अशीच एक परंपरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणच्या थेरगावमध्ये पाहायला मिळते. कारण या गावात घरावर गुढीपाडव्यानिमित्त उभारलेली गुढी सात दिवस डौलाने फडकवतात. छत्रपती संभाजी नगर शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेले आहे. थेरगावमध्ये गुढीपाडव्यानिमित्त वेगळी परंपरा पाहायला मिळते. गुढीपाडवा निमित्त गावातील नागरिक लोक वर्गणीतून अखंडित हरिनाम सप्ताहाचे आयोजन सुद्धा करतात. विशेष म्हणजे चैत्र मराठी नववर्ष सणानिमित्त अखंडपणे सात दिवस हरिनाम सप्ताहाचा आयोजन या गावांमध्ये करण्यात येतो तर सप्ताहाची सांगता होईपर्यंत नागरिक आपल्या घरांवरील पाडव्यानिमित्त उभारलेली गुढी ही सात दिवस कायम ठेवतात. त्यानंतर आठव्या दिवशी हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने सांगता होताच गावकरी आपल्या घरांवरील गुढ्या खाली उतरवतात.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढली जाते. शहरांमधील गुलमंडी येथे सकाळी साडेनऊ वाजता गुढीपूजन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे जनता ही गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा या शहराचे आराध्य दैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती येथून हि शोभयात्रा तीन वाजता सुरू होणार आहे. संस्थान गणपती मंदिर ते खडकेश्वर शिवमंदिर ही शोभायात्रा निघणार आहे. या शोभयात्रेच्या यंदाचे १८ वर्ष आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला शहरांमध्ये पारंपरिक पद्धतीचे घोडे, उंट, चित्ररथ, सजीव निर्जीव देखावे यांच्यासह शोभायात्रा काढण्यात येते.

थेरगावमध्ये हरिनाम सप्ताहाचा आयोजन आणि त्या निमित्ताने सात दिवस घरावर गुढी ठेवण्याची ही परंपरा २२ वर्ष आधीपासून सुरू आहे. गावांमधील प्रतिष्ठित बप्पासाहेब निर्मळ, गणपतराव निर्मळ, दादाराव नेहाले, भाऊसाहेब वाघ, बापूराव भुसारे, अशोक पाटील, कारभारी महाराज नजन, अशोक महाराज नेहाले यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी एकत्र येत अखंड हरिनाम सप्ताहाची गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही सुरुवात केली होती. तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे विशेष म्हणजे हरिनाम सप्ताह आणि गुढीपाडवा सण साजरा करण्यासाठी गावामधील सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. तसेच या सप्ताहात गावातील सर्व समाजाचे लोक सहभाग घेतात.

हे ही वाचा : 

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवत कायम करून वेतन फरक द्या, बाळासाहेब थोरात

शरद पवारांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss