KDMC: नव्या महिला आयुक्तांची नियुक्ती

KDMC: नव्या महिला आयुक्तांची नियुक्ती

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KALYAN-DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION) आयुक्त भाऊसाहेब दांडगे याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे कारण गुलदस्त्यात आहे. आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांच्या बदलीनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाल्या आहेत. डॉ. इंदूराणी जाखड यांची कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. इंदूराणी जाखड या महिला आर्थिक विकास महामंडळ येथे कार्यरत होत्या. त्यानंतर आता त्यांची कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेल्या डॉ. इंदुराणी जाखड पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१६ बॅचच्या अधिकारी असलेल्या डॉ. इंदुराणी जाखड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

अपर मुख्य सचिव नितीन गद्रे (NITIN GADRE) यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KALYAN-DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION) आयुक्त भाऊसाहेब दांगडे (BHAUSAHEB DANDGE) पत्राद्वारे नियुक्तीबाबत माहिती दिली. ‘शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित (MAHARASHTRA PETROCHEMICALS), मुंबई (MUMBAI) या रिक्त पदावर ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत उन्नत करून केली आहे. आपल्या जागी डॉ. इंदुराणी जाखड (INDURANI JAKHAD), भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार श्रीमती जाखड, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा.’ अशा आशयाचे पत्रक अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना दिले. अचानक केलेल्या बदलीचे कारण समजले नसले तरीही पहिल्या महिला आयुक्त कल्याण-डोंबिवली शहराला लाभल्यामुळे याबाबत चर्चा केली जात आहे.

हे ही वाचा : 

मालिकेत येणार मोठा ट्विस्ट;मधूभाऊंची  सुभेदारांच्या घरात होणार एन्ट्री!

Maharashtra: ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, संजय राऊतांची आक्रमक भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version