Sunday, May 19, 2024

Latest Posts

मालिकेत येणार मोठा ट्विस्ट;मधूभाऊंची  सुभेदारांच्या घरात होणार एन्ट्री!

मालिकेत येणार मोठा ट्विस्ट;मधूभाऊंची  सुभेदारांच्या घरात होणार एन्ट्री!

छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन पसंती देत आहेत,विशेष म्हणजे मालिकेतील सायली- अर्जुनवर देखील प्रेम करतात,ही मालिका टीआरपी रेटिंगमधील नंबर १ मालिका आहे,मालिकेत रोज नवनविन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात.दरम्यान ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत लवकरच दिवाळीचा आणि सायली-अर्जुनच्या पहिल्या दिवाळसणाचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना नवनवे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मालिकेच्या आगामी प्रोमोमध्ये मालिकेत प्रतिमा आणि मधूभाऊंची एन्ट्री होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

सुभेदारांच्या घराजवळ लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रतिमा येणार असून ती कोणाच्याही नकळत तिचं लक्ष्मीचं नाणं रांगोळीवर ठेवून निघून जाणार आहे. सायली प्रतिमाची खरी मुलगी असल्याने आपल्या आईची चाहूल सर्वप्रथम सायलीला जाणवते. कोणती तरी जवळची व्यक्ती घराजवळ येऊन गेल्याची जाणीव सायलीला होते. एवढ्यात पूर्णा आजीला प्रतिमाचं सोन्याचं नाणं सापडतं आणि ती माझी प्रतिमा इथे येऊन गेली असं सगळ्या सुभेदार कुटुंबीयांना सांगते. लक्ष्मीपूजन पार पडल्यावर अर्जुन दिवाळीच्या पाडव्याला बायकोला खास गिफ्ट देणार असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अर्जुन सायलीला खास सरप्राईज देण्यासाठी आश्रमातील मुलांना तिला भेटण्यासाठी घरी आमंत्रण देतो. सायली सगळ्या मुलांना भेटून आनंदी होते एवढ्यात घरी मधूभाऊंची एन्ट्री होते. अर्जुन चैतन्यच्या मदतीने मधूभाऊंची काही काळ सुटका करून घेतो. मधूभाऊंना पाहून सायलीला अश्रू अनावर होतात. यावर अर्जुन मिस सायली हेच तुमचं दिवाळी पाडव्याचं गिफ्ट आहे असं तिला सांगतो. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

मधूभाऊंशी भेट झाल्याने सायली अर्जुनचे आभार मानते आणि तुमचे हे उपकार मी केव्हाच नाही विसरणार असं त्याला सांगते. सायलीला आनंदी ठेवण्याची अर्जुनची धडपड आता चैतन्यलाही जाणवू लागली आहे. त्यामुळे मधूभाऊंच्या येण्याने सायली-अर्जुनचं नातं कसं वळण घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत मधूभाऊंची एन्ट्री येत्या महासोमवारच्या विशेष भागात म्हणजेच २० नोव्हेंबरच्या भागात होणार आहे.त्यामुळे आता पुढे काय होणार यासाठी प्रेक्षक उस्तुक असल्याचं समझत आहे.

हे ही वाचा : 

अंकिता लोखंडे देणार गुडन्युज,बिग बॉसच्या घरात केली प्रेग्नेंसी टेस्ट

Balasaheb Thackeray: हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं..आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss