स्वत:चा संस्कृतपणा बघा, मग मुख्यमंत्र्यांना बोला; शिवसेना प्रवक्ते आक्रमक

स्वत:चा संस्कृतपणा बघा, मग मुख्यमंत्र्यांना बोला; शिवसेना प्रवक्ते आक्रमक

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे, संजय राऊत, महाविकास आघाडी तसेच बैठकीबाबत भाष्य केले. संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचे माध्यमांशी बोलताना शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले. संजय राऊत यांची संस्कृती आपण सर्वांनी पाहिलेली आहे. ते काय बोलतात? कसे वागतात? तुम्ही पाहिलं असेल. त्यांनी थुंकण्याचं काम मीडियासमोर केलेलं आहे. संजय राऊत यांचा संस्कृतपणा संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे यावेळी नरेश म्हस्के यांनी म्हटले. 

महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर नरेश म्हस्के म्हणाले की, पैसे देऊन माणसं आणावी लागली तरीही सभेचे मैदान रिकामं  होतं. आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील तेव्हा बैठक होईल, असेही नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत जाण्याची चर्चा सुरु असतांना त्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. याबद्दल नरेश म्हस्के म्हणाले की, राज ठाकरे यांचं महायुतीत स्वागत असेल. जर असं झालं तर मला खूप आनंद होईल. राज ठाकरे महायुतीत आले तर मला पुन्हा त्यांच्यासोबत काम करायला मिळेल, असा आशावाद नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

हे ही वाचा:

Covid Vaccine मुळे लोकं आजारी पडायला लागले, Praniti Shinde यांचा अजब दावा

राजकीय पक्षांनी निवडणूकीच्या नियमांचे पालन करावे, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version