Monday, May 20, 2024

Latest Posts

Covid Vaccine मुळे लोकं आजारी पडायला लागले, Praniti Shinde यांचा अजब दावा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरत आमदार प्रणिती शिंदे यांना गावांना भेट देण्याचे कार्य सुरु केले आहे. यादरम्यान त्यांनी अजब  दावा केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदेंनी भेट देत लोकांशी संवाद साधला. कोविड वॅक्सिनमुळे ज्यांना काही दुखणे नव्हते अशांना देखील बीपी शुगर हृदयविकार झाले. सरकारने वॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे लोकांना जबरदस्ती केली, असा दावा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिले…

याच दरम्यान, इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी वॅक्सीन संदर्भात दावा केला. सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेवर ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले. आपल्याला ज्या सिरम कंपनीचे जबरदस्तीने वॅक्सिन दिले त्या कंपनीने देखील १०० कोटी रुपये दिले आहेत, आपल्याला मारण्यासाठी, टेन्शन नका घेऊ पण आपल्याला वॅक्सीन जबरदस्ती का केलं? कारण सरकारने वॅक्सीन विकत घेतलं.

तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने…

तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने वॅक्सिन विकत घेतले. तुम्हाला त्या वॅक्सीनसाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणे सुरू झाले आहे. ज्यांना काहीच नव्हतं अशांना देखील काही ना काही बीपी शुगर हृदयविकार चालू झाले, मी तर वॅक्सीन घेतलंचं नाही. मी खरोखर वॅक्सिन घेतले नाही. वॅक्सिन  सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो असताना मी  ते कशासाठी घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते. असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी गाव दौऱ्यावर असताना केला.

हे ही वाचा:

विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, पक्ष प्रवेश करताना पाडवींना अश्रू अनावर

जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो, उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते; देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss