ठाण्यात रंगणार कबड्डीचा थरार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

Thane : सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९. ३० वाजता कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, सिद्धेश्वर तलावाजवळ, चंदनवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे.

ठाण्यात रंगणार कबड्डीचा थरार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

Thane : कबड्डी खेळ हा ठाणे जिल्ह्यात अत्यंत लोकप्रिय असा मैदानी खेळ आहे. याचं पार्श्वभूमीवर ठाण्यात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका रहिवाशांच्या कला, क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर व भाजपा ठाणे शहर(जिल्हा) अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजपा ठाणे शहर सचिव तथा सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे सल्लागार रमेश सागळे यांच्यावतीने ठाणे शहर भाजपा व सन्मान फाऊंडेशन आयोजित सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९. ३० वाजता कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, सिद्धेश्वर तलावाजवळ, चंदनवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमास ठाणे, रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभणार आहे. ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनीही या क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजक रमेश सागळे यांनी केले आहे.

गेली अनेक वर्षे सुधागड तालुक्यात होणार्‍या कबड्डी स्पर्धा ठाणे शहरातील रहिवाशांसाठी व्हायला हव्यात या भावनेने ठाण्यात वास्तव्यास असलेले सुधागड तालुका रहिवासी आणि त्यांच्या विकासासाठी झटणार्‍या ठाण्यातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते तथा सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश सागळे यांनी सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सुधागड तालुक्यातील २६ संघाचा समावेश असलेल्या स्पर्धेत राज्यस्तरावरील क्रीडा पंच देखरेख करणार असून या कार्यक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, क्रीडा समितीप्रमुख राकेश थोरवे, चिटणीस अविकांत साळुंखे, जयगणेश दळवी, सुधीर नेमाणे, अजित सागळे, धनंजय खाडे, सुनिल तिडके यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या तरुण होतकरू खेळाडू, कलाकार यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

दिलखुलास राज; सल्ला, उपदेश धकधकत्या काळाची अनुभूती

आलिया भट्टच्या चाहत्यांना ६८ व्या फिल्मफेअर पुरस्काराची आतुरता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version