Monday, May 20, 2024

Latest Posts

आलिया भट्टच्या चाहत्यांना ६८ व्या फिल्मफेअर पुरस्काराची आतुरता

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या दोन्ही चित्रपटामुळे ती खूप चर्चेत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या दोन्ही चित्रपटामुळे ती खूप चर्चेत आहे. चित्रपटांच्या व्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूप चर्चेत असते. आलियाने तिच्या अभिनयाने सर्व तिच्या चाहत्यांची मने तर तिने जिंकली आहेत. अलीकडेच ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी (68th Filmfare Awards) नामांकनाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये आलियाने देखील या यादीमध्ये स्थान मावळे आहे.

चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. आता नुकतेच या पुरस्कारासाठीचे नामांकन जाहीर करण्यात आले आहेत. मीडियाच्या रिपोर्टनुसार यावर्षी सलमान खान (Salman Khan), आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि मनीष पॉल (Manish Paul) एकत्र हा अवॉर्ड फंक्शन होस्ट करणार आहेत. या वर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण यासह दहा नामांकने मिळवली आहेत आणि विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स देखील रिंगणात आहे.

याचबरोबर ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा सारखे चित्रपट देखील या वर्षातील सर्वाधिक नामांकित चित्रपटांमध्ये आहेत. या पुरस्कार सोहळ्याला या वर्षी विकी कौशलपासून टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर आणि अगदी गोविंदापर्यंत, अनेक सेलिब्रिटीज त्यांच्या डान्सने त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत. चाहते या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता आलियाच्या चाहत्यांना नॉमिनेशनमुळे आणखी आनंद झाला आहे. लवकरच आलिया करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिचा पती रणवीर कपूरही तिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हे ही वाचा : 

‘एकनाथ शिंदे सावध राहा’, राज ठाकरेंनी दिला मोलाचा संदेश

राज्यात नवं संकट? अवकाळी पावसाचा घातला धुमाकूळ!

CSK vs RR आमनेसामने, कोणाचं पारडं होईल भारी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss