Tuesday, May 7, 2024

Latest Posts

दिलखुलास राज; सल्ला, उपदेश धकधकत्या काळाची अनुभूती

Raj Thackeray Interview : राज ठाकरे यांना महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार, स्पष्ट वक्ते राज ठाकरे या पाच अक्षरांचा दरारा महाराष्ट्रातील राजकारणात नाही त्या देशातील राजकारणात पाहायला मिळतो.

Raj Thackeray Interview : राज ठाकरे यांना महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारणातील अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार, स्पष्ट वक्ते राज ठाकरे या पाच अक्षरांचा दरारा महाराष्ट्रातील राजकारणात नाही त्या देशातील राजकारणात पाहायला मिळतो. लोकमत समूहाचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचा भव्य दिव्य सोहळा मुंबईतील वरळीत पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत राहिली आहे. राज ठाकरेंची मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व समाजसेविका अमृता फडणवीस यांनी घेतली. यावी अनेक गोड, तिखट, आंबट, आणि कडू प्रश्नाचे दिलखुलासपणे उत्तरे राज ठाकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना एका वाक्यात काय सल्ला द्याल असा प्रश्न जेव्हा अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना केला तेव्हा स्पष्टपणे यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथराव शिंदे यांना जपून राहा, देवेंद्र फडणवीस यांना वरती संबंध नीट ठेवा, अजित पवार यांना बाहेर जेवढं लक्ष देत आहात तितकं काकांकडे पण द्या, उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल त्यावर, त्यांना काय सांगणार मी ते स्वयंभू आहेत. आदित्य ठाकरे यांना तेच ते, असं राज ठाकरे म्हणाले.

शर्मिला ठाकरे राजकारणात आल्या तर चालेल का असा प्रश्न यांनी राज ठाकरेंना विचारले असता यावर मिश्किल असं उत्तर दिलं आहे. त्या जास्त फायर आहेत. घरोघरी मातीच्या चुली, त्या जर राजकारणात आल्या तर मी घरचं काम करायला तयार आहे असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिक मे एक हत्ती सत्ता दिली. या काळात मनसेने नाशिकचा मोठ्या प्रमाणात विकास केला याला अनुसरूनच जेव्हा डॉ. अमोल कोल्हे यांनी रॅपिड फायर राउंडमध्ये आवडतं शहर कोणतं मुंबईची नाशिक असा प्रश्न विचारला तेव्हा मी नाशिकला काम करून दाखवलं, निवडणुकीमध्ये यश नाही आलं हा भाग सोडा. माझा जन्म मुंबईमध्ये झाला वाढलो मुंबईमध्ये पण माझं खरंच प्रेम हे महाराष्ट्रावर आहे. विनाकारण सांगत नाही पण माझी ती श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपली ओळख आहे, त्या महाराष्ट्राबद्दल आपण अभिमान बाळगणं, प्रेम असतं दुसरं काय असू शकतं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिलखुलास उत्तरांनी ही मुलाखत आणखीन फुलत गेली.

हे ही वाचा : 

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खासदार ब्रिजभूषण सिंह यांना आमंत्रित केल्याने नव्या वादाला सुरुवात

प्रत्येकाला ठेका धरायला लावणार ‘फकाट’मधील ‘भाई भाई’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss