जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंच नाव…. CM Eknath shinde यांचा गौप्यस्फोट

आपल्याकडे एकाहून एक चांगले पदाधिकारी आहेत. सगळ्यांना एकाच ठिकाणी पाठवून चालणार नाही. आनंद दिघेंचा हा ठाणे जिल्हा आहे.दरम्यान, आमचे नेते पायाला भिंगरी लावल्यासारखं काम करत आहे.असं म्हणत पंतप्रधानांची स्तुती देखील केली. 

जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंच नाव…. CM Eknath shinde यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना

काल तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचारसभा थंडावल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknathshinde ) यांच्या ठाणे येथे महायुतीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला. “आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना जोड्याने मारलं असतं”असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

“महाविकास आघाडीकडे ना झेंडा, ना अजेंडा आणि ना नेता आहे.१-१ वर्ष पंतप्रधान पद हे काय महापौर पद आहे का? आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा नेता आहे. विरोधकांकडे कट-कारस्थान, भ्रष्टाचार,आहे. काही लोकांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेली आहे. घरात बसून सरकार चालतं.त्यांना काय औदसा आठवली आणि वर्धापन दिनादिवशी काही तरी बोलून गेले.”असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर बाळासाहेबांचे विचार विसरणाऱ्यांसोबत राजन विचारे गेले म्हणुन ते नकली आणि नरेश म्हस्के हे असली कार्यकर्ते आहेत. 

आनंद दिघेंना (Anand Dighe) एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचल्यानंतर ते पद काढून घेणे किती जिव्हारी लागले असेल. दिघेसाहेबांचे पद काढले तर ठाणे जिल्हा, नाशिक, पालघर इथे एक माणूस तुमच्याकडे राहणार नाही असं सांगितले तेव्हा शांत झाले.आनंद दिघेंना ठाणे जिल्हाप्रमुख पद सोडायला भाग पाडलं जात होते. पदाचा राजीनामा देण्याचे फर्मान आले होते.असं सांगत मुख्यमंत्री यांनी दिघेंच्या आयुष्यातील अनेक घटनांवर भाष्य केले. 

 

राज ठाकरेंबाबत (Raj Thackeray) बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) म्हणाले की, “जेव्हा आनंद दिघेंनी नेते पदासाठी राज ठाकरेंच नाव पुढे केले, राज ठाकरेंनी फार मेहनत घेतली असून त्यांच्या नावाचा विचार व्हावा असं म्हणाले होते. त्यानंतर लगेचच दिघेसाहेबांना फोन आले, दिघेसाहेब गाडीत बसून निघून गेले आणि पुढील २ दिवस ते कुणालाही भेटले नाहीत. एवढा त्यांना मानसिक त्रास झाला, त्यामागे कोण होते? दिघेसाहेब गेल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा मला काय प्रश्न विचारावा, ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?, फकीर माणूस, दोन्ही हाताने सर्व वाटणारा माणूस, ज्या माणसाने शाखेत आयुष्य काढले, ना घर, ना बिल्डिंग असं मी म्हटलं. त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आहे असं मला वाटलं.”

दरम्यान, ठाणे हा धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला आहे. नरेश म्हस्केंसारखा एक लढवय्या कार्यकर्ता दिला आहे. हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. राजनचा सीझन आता संपला, नरेश म्हस्केंचा चांगला विजय होणार. आता महापालिका नव्हे तर लोकसभा संसद भवन बघा, म्हस्के गेल्या अनेक वर्षापासून काम करतायेत. आपल्याकडे एकाहून एक चांगले पदाधिकारी आहेत. सगळ्यांना एकाच ठिकाणी पाठवून चालणार नाही. आनंद दिघेंचा हा ठाणे जिल्हा आहे.दरम्यान, आमचे नेते पायाला भिंगरी लावल्यासारखं काम करत आहे.असं म्हणत पंतप्रधानांची स्तुती देखील केली. आपल्याकडे एकाहून एक चांगले पदाधिकारी आहेत. सगळ्यांना एकाच ठिकाणी पाठवून चालणार नाही. आनंद दिघेंचा हा ठाणे जिल्हा आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील पराभव Mahayuti ला स्पष्ट दिसतोय, Amol Kolhe यांचा टोला

Vijay Wadettiwar यांच्या वक्तव्यावरून BJP आक्रमक, नागपुरात पुतळा दहन करून केला निषेध व्यक्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Exit mobile version