Saturday, May 18, 2024

Latest Posts

Vijay Wadettiwar यांच्या वक्तव्यावरून BJP आक्रमक, नागपुरात पुतळा दहन करून केला निषेध व्यक्त

काँग्रेस (Congress) नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माजी शहिद पोलीस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्या हत्येबद्दल एक वक्तव्य केले होते. माजी पोलीस महासंचालक एस एम मुश्रीफ (S. M. Mushrif) यांच्या ‘हेमंत करकरे यांना का व कुणी मारले?’ या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी ‘हेमंत करकरे यांचा खून कसाबने केला नसून आर आर एस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने केला असल्याचे सांगितले होते. तसेच, महायुतीचे उमेदवार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यावर टीका करत, ‘उज्ज्वल निकम हा बेईमान माणूस आहे. वकील नसून तो देशद्रोही आहे.” असे वक्तव्य केले होते. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून भाजप (BJP) कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात काल (रविवार, ५ मे) भाजपा युवा मोर्चा कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. विजय वडेट्टीवार यांच्या नागपूरमधील रामदास पेठ येथील निवासस्थानासमोर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी भाजपा युवा मोर्चाकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी शिवानी दाणी यांनी यावेळी बोलताना, “वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा वक्तव्य करू नये जर केल्यास त्यांना आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ,” असे म्हणाल्या. तसेच, ‘इतकी महत्त्वाची माहिती विजय वडेट्टीवार यांच्याकडे उपलब्ध होती तर ती त्यांनी आतापर्यंत का दिली नाही? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे वक्तव्य का करतात?’ असा सवाल ही भाजपा युवा मोर्चा कडून उपस्थित करण्यात आला.

याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत आणि देशातील न्यायालयावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. सुरुवातीला पाकिस्तानची जनता बोलत होती कि, कसाबने काही केलेलं नाही पण कसाब आमचा रहिवाशी होता हे पाकिस्तानला देखील मान्य करावं लागलं. आणि त्यानेच अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत.२००८ साली मुंबईवर हल्ला झाला तेव्हापासून २०१४ पर्यंत महाराष्ट्रात आणि देशात कॉंग्रेसचं सरकार होतं. आज विरोधी पक्ष नेते अशी वक्तव्य करत आहेत ज्यामुळे याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे.”

हे ही वाचा:

Ajit Pawar यांनी रडण्याची ऍक्टिंग करून उडवली खिल्ली, Rohit Pawar यांनी दिले प्रत्युत्तर, तुमच्यासारखे मगरीचे नरकाश्रू नाहीत!

“पाकिस्तानची भाषा करणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून दिली पाहिजे”; फडणवीसांची विडेट्टीवारांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss