Sunday, May 19, 2024

Latest Posts

महाराष्ट्रातील पराभव Mahayuti ला स्पष्ट दिसतोय, Amol Kolhe यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) विद्यमान खासदार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज अहमदनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीला पराभव स्पष्ट दिसत आहे असे व्यक्तव्य केले. तसेच, केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या काळात घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर टीका केली. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या नावाखाली फसवी निर्यातबंदी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली, ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे. प्रत्येक मेट्रिक टनावर ५५० डॉलर हा चार्ज तर ४० % निर्यात शुल्क लावली गेली आहे. हे सर्व तसेच वाहतूक खर्च जोडता जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर हा ६५ ते ७० रुपये इतका होईल. त्यामुळे ही निर्यात बंदी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे.”

महायुतीवर (Mahayuti) टीका करत ते म्हणाले, “महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, दोनशे आमदार, दोन फोडलेले पक्ष, त्यांचे चोरलेले नेते एवढे सर्व असताना देखील पंतप्रधान आणि केंद्रातील नेत्यांना यावे लागते आहे. यावरून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसून येते. त्यामुळे महायुतीला एवढी धावाधाव करावी लागते.”

शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने आज ते कुठल्याही सभेत अथवा कार्यक्रमात उपस्थित राहणार नाहीत. यावरून अमोल कोल्हे म्हणाले, “उन्हाचा तडका वाढल्याने उन्हाचा त्रास प्रत्येकाला जाणवतो. आवाजाचा त्रास झाल्याचा मला समजले. साहेब तीन ते चार सभा एकाच दिवशी महाराष्ट्रभर घेत आहेत. त्यामुळे एक दिवसाचा आराम झाला की पवार साहेब पुन्हा त्याच ऊर्जेने व ताकदीने महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी तयार होतील.”

हे ही वाचा:

पवारांच्या लेकीसाठी पवारांची “सून” प्रचाराच्या रिंगणात

खंडोबा आपणांस लवकरात लवकर….हेमंत ढोमे यांची भावनिक पोस्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss