Monday, May 20, 2024

Latest Posts

जागतिक एड्स दिन २०२३: ठाण्यातील AIDS रुग्णसंख्या घटली

एकात्मिक चाचणी व सल्ला केंद्र २६, प्राथमिक आरोग्य केंद्र ३२, नागरी आरोग्य केंद्रे १००, खासगी रुग्णालयातील चाचणी केंद्रे ४५ अशी त्यांची संख्या आहे. अतिजोखमीच्या गटासोबत काम करणाऱ्या संस्था ३२ असून सुरक्षा क्लिनिक ५, एआरटी सेंटर ६ आणि रक्तपेढ्यांची संख्या ६ इतकी आहे.

आज जगभारत जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरात जागतिक एड्स दिन (World AIDS Day) १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. एड्स (एचआयव्ही) (HIV) हा मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या (Human Immune deficiency virus) संसर्गामुळे पसणारा हा आजार आहे. या आजराबदल लोकांमध्ये अनेक समज गैसमज आहेत. जागतिक एड्स दिन समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने, ठाणे जिल्ह्यातील एड्स रुग्णांबाबत संशोधन केले असता, जिल्ह्यातील एड्स रुग्णांची संख्या घटल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यात एड्स रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट होत असली तरी एखाद्या वर्षी रुग्ण संख्येमध्ये र्थोड्या प्रमाणत वाढ दिसत आहे. २०१०-२०११ पासून २०२०-२०२१ पर्यंत प्रत्येक वर्षी रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्याचे दिसून येते. मात्र, २०२१-२०२२ आणि २०२२-२०२३ या वर्षात पुन्हा रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात किंचीतशी वाढ झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ हजार ६८३ (प्रमाण ०.५० टक्के) रुग्ण आढळून आले होते. यंदा ऑक्टोबरपर्यंत ०.४७ टक्के म्हणजेच ९६७ रुग्ण आढळले असून दुसरीकडे एड्सबाधित गरोदर मातांच्या संख्येतही चढ-उतार होत आहे. एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत एकूण १ लाख २६ हजार ८३४ चाचण्यांमध्ये ३५ गरोदर मातांना एड्सची लागण झाल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यात २० फेब्रुवारी २००९ साली जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य नियंत्रण संस्थेच्या वतीने सुरक्षित रक्तपुरवठा, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, गुप्तरोग नियंत्रण कार्यक्रम, कौटुंबिक आरोग्य जागृती मोहीम, शालेय किशोरावस्था जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, एचआयव्ही संसर्गित रुग्णांसाठी कम्युनिटी केअर सेंटर, ड्रॉप इन सेंटर, स्वयंसेवी संस्थामार्फत हस्तक्षेप प्रकल्प तसेत अन्य जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन, एआरटी केंद्रात रक्त चाचणी करण्यासह समुपदेशनही केले जाते. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणीसह अन्य सुविधाही मोफत दिल्या जातात. ठाणे जिल्ह्यात एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत केंद्रे उपलब्ध आहेत.
एकात्मिक चाचणी व सल्ला केंद्र २६, प्राथमिक आरोग्य केंद्र ३२, नागरी आरोग्य केंद्रे १००, खासगी रुग्णालयातील चाचणी केंद्रे ४५ अशी त्यांची संख्या आहे. अतिजोखमीच्या गटासोबत काम करणाऱ्या संस्था ३२ असून सुरक्षा क्लिनिक ५, एआरटी सेंटर ६ आणि रक्तपेढ्यांची संख्या ६ इतकी आहे.

उत्तम आरोग्यासाठी हिवाळ्यात बनवा डिंकाचे लाडू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss