Saturday, May 18, 2024

Latest Posts

इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टानं दिला झटका

प्रसिद्ध किर्तनकार हभप इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकरांची याचिका फेटाळली आहे.

प्रसिद्ध किर्तनकार हभप इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकरांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळं त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शिर्डीतील ओझर इथं एका किर्तनात पुत्रप्राप्तीबाबत कोणताही वैज्ञानिक आधार नसलेलं दिशाभूल करणार विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकरांनी केलेलं विधान हे गर्भलिंगनिदानाची जाहिरात केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. PCPNDT च्या सल्लागार समितीनं या विधानावरुन इंदुरीकरांना कारणेदाखवा नोटीस पाठवली होती.

यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सत्र न्यायालायनं इंदुरीकांवरील गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द ठरलला होता. यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात इंदुरीकरांविरोधात तीन वकिलांनी धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टानं सत्र न्यायालायाचा आदेश रद्द केला. औरंगाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला इंदुरीकरांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यामध्ये सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना हायकोर्टाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवत याचिका निकाली काढली. त्यामुळं इंदुरीकांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी शिर्डीतील ओझर इथं एका किर्तनात दावा केला होता की, “स्त्री-पुरुषाचा संग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि जर विषय तिथीला झाला तर मुलगी होते. पण जर या तिथी हुकल्या तर मुलं बेवडी, खानदानाचं नाव मातीत मिसळणारी होतात.

यासाठी त्यांनी पुलश्य नावाच्या ऋषीचं उदाहरण देताना त्यानं कैकसी नावच्या स्त्री बरोबर सूर्य मावळत असताना संग केल्यामुळं रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले. तसेच आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केल्यामुळं त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू हा राक्षस जन्माला आला. या हिरण्यकशपूनं नारायण म्हणून संग केल्यानं भक्त प्रल्पाद जन्माला आला, असं त्यांनी म्हटलं होतं.

हे ही वाचा:

राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर एकमेकांवर बरसले

सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss