Sunday, May 19, 2024

Latest Posts

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

काल दि. १६ मार्च पासून राज्याचे देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या जरा जास्तच चर्चेत आहेत.

काल दि. १६ मार्च पासून राज्याचे देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या जरा जास्तच चर्चेत आहेत. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणाबाबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी एक ट्वीट शेअर केले. त्यामुळे खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर सुरु आहे. म्हणजेच प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट शेअर केलं तर त्यानंतर अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट शेअर केलं.

प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्वीट –

प्रियांका चतुर्वेदी यांनी एका न्यूज आर्टिकलचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यात लिहिले आहे की, ‘गुन्हेगाराच्या मुलीला उपमुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो आणि ती त्यांच्या पत्नीशी ५ वर्षांहून अधिक काळ मैत्री करते (विधानसभेतील DCM विधानानुसार). ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींना दागिने, घालायला कपडे (प्रमोशनसाठी) देते. तसेच ती त्यांच्यासोबत गाडीमध्ये देखील फिरते.’ आणखी एका ट्वीटमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी लिहिलं की, ‘महाराष्ट्रात काय चालले आहे श्री नरेंद्र मोदी जी?’ प्रियंका चतुर्वेदी यांच्या या ट्वीटला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे.

अमृता फडणवीस यांचे ट्वीट –

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला आता अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे. त्या ट्विट मध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, ‘मॅडम चतुर-आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी AxisBank ला फायदा मिळवून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? निश्चितच, तुमचा विश्वास जिंकून, जर कोणी तुमच्याशी संपर्क साधला असता आणि केस बंद करण्यासाठी पैसे दिले असते, तर तुम्ही तुमच्या बॉसद्वारे त्याला मदत केली असती. तीच तुमची औकात आहे.’

प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्वीट –

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले. त्यांच्या या ट्विटला आता अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला. परंतु आता पुन्हा एकदा प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे. यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, “नशीब, प्रमोशनसाठी डिझायनर कपडे विकत घेण्याची माझी औकात नाहीये. ज्यामुळे नंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. मिस फॅड-नॉइज. मला कळत नाही की स्वतंत्र तपासाच्या मागणीने तुमचा इतका गोंधळ का झाला? प्रामाणिकपणे ज्या दिवशी तिने तुम्हाला पैसे कमावण्याच्या टिप्स दिल्या त्याच दिवशी तुम्ही तिच्या विरोधात तक्रार करायला हवी होती,” असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

काय आहे संपूर्ण प्रकरण? –

अनिक्षाच्या विरोधात अमृता फडणवीस यांनी जो FIR केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अनिक्षाशी पहिली भेट २०२१ मध्ये झाली होती. अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की अनिक्षाने त्यांना हे सांगितलं होतं की ती डिझायनर आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना हे सांगितलं की पब्लिक इव्हेंटमध्ये तुम्ही मी डिझाइन केलेले ड्रेसेस आणि ज्वेलरी परिधान करा. त्यामुळे मला माझ्या ब्रांडचं प्रमोशन करता येईल. अमृता फडणवीस यांनी ही बाब मान्य केली. मात्र अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात IPC च्या कलम १२० बी नुसार आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता फडणवीस यांनी हा एफआयआर मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला दाखल केली होती.

हे ही वाचा :

Poco X5 5G चे भारतात पदार्पण, फीचर्स पाहून व्हाल आनंदाने वेडे

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना…, तारांकित प्रश्नांद्वारे छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

Sameer Khakhar यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दु:खद निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss