Saturday, May 18, 2024

Latest Posts

२०२४ च्या निवडणुकांमध्ये कोण ठरणार सरस ???

वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकापाठोपाठ एक भूकंप पाहायला मिळत आहे. आधी शिवसेनेतील (Shiv Sena) प्रबळ नेते समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड करत ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपची (BJP) कास धरली

वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकापाठोपाठ एक भूकंप पाहायला मिळत आहे. आधी शिवसेनेतील (Shiv Sena) प्रबळ नेते समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड करत ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपची (BJP) कास धरली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
कधी ही ना घडलेल्या नुपेक्षीत गोष्टी या राजकारणात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून घडताना बघायला मिळाल्या. महाराष्ट्रातील राजकारणातील या नाट्यमय घडामोडींच्या मागे भाजपचाच हात असून २०२४ च्या निवडणुकांसाठीच भाजप जुळवाजुळवर करत असल्याची मतं अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडली आहे. अशातच याचा खरंच भाजपला फायदा होणार की विरोधक मुसंडी मारणार हे निवडणूक निकालांमध्येच स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात २०२४ मध्ये अग्नी विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल अद्याप वाजलं नसलं, तरी त्याआधी सर्वच पक्षांच्या नजरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे लागल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्यात दोन सर्वेक्षणं करण्यात आली आहेत. पहिलं सर्वेक्षण झी न्यूज आणि मेटाराइजनं केलं आहे. तर, दुसरं सर्वेक्षण टाईम्स नाऊ नवभारतनं केलं आहे. या सर्वेक्षणातून महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? आणि निवडणूक निकालांनंतर कोणाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, याचा अंदाज बांधण्यात आला आहे. आता दोन्ही सर्व्हेक्षणात कोणत्या पक्षाला फायदा होतोय? आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार? याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

दोन्ही सर्वेक्षणांचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. झी न्यूजनं आपल्या सर्वेक्षणात जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आज जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोणाचं सरकार बनू शकतं? हा प्रश्न विचारला. सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे आणि भाजप (युती सरकार) गटाला १६५ ते १८५ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाला बहुमत मिळत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. म्हणजेच, सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, महाराष्ट्रातील आघाडी सरकार १४५ चा बहुमताचा टप्पा ओलांडू शकतं. तर, महाविकास आघाडीला (MVA)८८ ते ११८ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला दोन ते पाच तर इतरांना १२ ते २२ जागा मिळू शकतात.

टाईम्स नऊ नवभारतच्या सर्वेक्षणच्या साहाय्याने असे दिसून आले की , लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्रात दुसरं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. हे सर्वेक्षण TNN नं केलं. या सर्वेक्षणात जनतेला प्रश्न विचारण्यात आला होता की, आज लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आता आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात भाजपला २२ ते २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला (MVA) १८ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एक ते दोन जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यामुळे आता हे बघणे गरजेचं आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये कोण कोणावर भारी पडणार आहे.

हे ही वाचा:

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss