Tuesday, May 21, 2024

Latest Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती सर्व दूर पसरली आहे. देशभरातून वेगवेगळ्या भागातून भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती सर्व दूर पसरली आहे. देशभरातून वेगवेगळ्या भागातून भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. दहा दिवस लालबाग नगरीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी, नेते मंडळी दर्शनासाठी जातात. मोठमोठ्या रांगा लावून भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांनी तिकडे जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा सोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार हा देखील दर्शनासाठी गेला होता.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जाऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
अजित पवार यांच्या सोबत मुलगा पार्थ पवार याने सुद्धा लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
अजित पवार हे असे राजकारणी आहेत जे सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. तसेच त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन देखील सकाळी लवकर घेतले.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. उद्या अनंत चतुर्दशी असल्यामुळे आज सकाळ पासून दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
अजित पवार यांनी राजाला पुष्पहार अर्पण केला. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाला होता. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले.

Latest Posts

Don't Miss