Monday, May 20, 2024

Latest Posts

मुंबईतील मानाच्या गणपतीचे मुखदर्शन सोहळा पडला पार; मुंबईचा राजा, गिरगावचा राजा….

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच तास उरले आहेत. मोठ्या जल्लोषात आणि आनंदात गणपती बापाचे आगमन होणार आहे.

Ganeshostav 2023 – गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच तास उरले आहेत. मोठ्या जल्लोषात आणि आनंदात गणपती बापाचे आगमन होणार आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर त्याची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आता मुंबईतील प्रतिष्ठित बाप्पाचे आगमन झाले आहे. मुंबईचा राजा, गिरगावचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपतीचे आगमन झाले आहे. प्रत्येक राजाच्या दरबारात वेगवेगळे देखावे साकारण्यात आले आहेत. यावर्षी मुंबईच्या राजाच्या दरबारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी थेट रायगडावरुन माती आणून तिचे पूजन करण्यात येणार आहे.

मुंबईच्या राजाचे आगमन १७ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडले. मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणपतीचे आगमन झाले आहे.
या वर्षी मुंबईच्या राजाच्या दरबारात राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा करण्यात आला आहे. यासाठी थेट रायगडावरून माती आणून तिचे पूजन करण्यात येणार आहे.
पर्यावरण पूरक गणपती म्हणून ओळख असलेल्या गिरगावच्या राजाचा (Girgaoncha Raja) मुखदर्शन सोहळा रविवार १७ सप्टेंबर रोजी पडला आहे.गिरगावच्या राजाचे विशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती शाडू मातीने बनवली जाते. त्यामुळे या गणपतीला पर्यावरण पूरक गणपती म्हणून ओळख मिळाली आहे.
चिंतामणीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. चिंतामणीच्या दर्शानासाठी भक्तांची मोठी गर्दी असते.यंदाच्या वर्षी मूर्तीमध्ये यंदा राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे.
या वर्षी मुंबईच्या राजाच्या दरबारात राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा करण्यात आला आहे. यासाठी थेट रायगडावरून माती आणून तिचे पूजन करण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss