बाप बदलण्याची नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू आहे;रोहिणी खडसेंची अजित पवारांवर टीका

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.

बाप बदलण्याची नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू आहे;रोहिणी खडसेंची अजित पवारांवर टीका

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे. तर शरद पवार यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यावर अनेक नात्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. जन्मदात्या बापाचे नाव लावणे अपेक्षित असतांना राजकारणात मात्र, बाप बदलण्याची नवीन पद्धत आली आहे, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, खरं पाहिलं तर असा निकाल येणं अपेक्षित होत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष वाढवला त्याच पक्षाचे चिन्ह काढून घेण्यात आले. त्यामुळे हे माहित होत आपल्या पक्षाचंही चिन्ह काढले जाईल. या निकालामुळे लोकशाही आता महाराष्ट्रात आणि भारतात शिल्लक राहिलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार हे आमची एकमेव ताकद आणि पक्ष आहे. पवार साहेब आमच्या सोबत असल्याने, लढेंगे भी और जितेंगे भी, असे रोहिणी खडसे म्हणल्या. सुप्रिया ताईंनी सांगितल्याप्रमाणे या सर्व निर्णयामध्ये अदृश्य शक्ती आहेत. देशभरात जनतेमध्ये जो संतोष आहे तो मतदानाच्या माध्यमातून बाहेर येणार आहे. जन्म देणाऱ्या बापाचं नाव लागलं पाहिजे, जन्म देणाऱ्या बापाचाच हा पक्ष असायला हवा, मात्र बाप बदलण्याची ही नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू आहे, असे रोहिणी खडसे म्हणल्या.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अजित पवारांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष असे नावं आम्हाला दिले आहे. यांनी घड्याळ मनगटावरून पाकीटमारासारखं चोरले. पण आमचे मनगट मजबूत आहे. आमचा पक्ष, आमचे नावं शरद पवार हे मी आधीच सांगत होतो. आयोगाचा निर्णय दुटप्पी, संभ्रम निर्माण करणारा आहे. हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते? हा पक्ष कोणी मोठा केला? यावर धडान्त खोटं निवडणूक आयोग बोललय. निवडणूक आयोग कटपुतली झालेय, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा: 

‘माझ्या आयुष्यात असा एकही क्षण …लेकाची अशोक सराफासाठी खास पोस्ट | Ashok Saraf | Aniket Saraf

RBI ने दिला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा, रेपो दर जैसे थे | Shakti Kant das | Nirmala sitharaman

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version