बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या घराण्यातून कोण करणार पोटनिवडणुकीत एंट्री

गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहे.

बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या घराण्यातून कोण करणार पोटनिवडणुकीत एंट्री

गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहे. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांनी पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे ती पार पडायला आवडेल असे सांगत लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा स्वरदा बापट जाहीर केली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची मोठी संख्या पाहता उमेदवारी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न पक्षासमोर उपस्थित झाला आहे. तर तिकडे कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीकडून देखील दावा केला जात आहे. स्वरदा बापट यांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. कसब्याच्या निवडणुकीच्यानंतर आता लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे पुण्यामध्ये वाहायला लागले आहेत.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन दीड महिना उलटल्यानंतर उमेदवारीवरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट आणि त्यांची सून स्वरदा यांनी लक्षणे जबाबदारी दिल्यास पार पडायला आवडेल अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये स्वरदा बापट यांच्याबरोबर शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी अशी भाजपकडे इच्छुकांची नावे आहेत. कसब्यात उमेदवार चुकल्याने भाजपला हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपला खूप विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version