OBC नेते Prakash Shendage आणि Vishal Patil एकत्र येणार? Sangali मध्ये ‘जत पॅटर्न’ राबवण्याचा शेंडगेंचा प्रस्ताव

OBC नेते Prakash Shendage आणि Vishal Patil एकत्र येणार? Sangali मध्ये ‘जत पॅटर्न’ राबवण्याचा शेंडगेंचा प्रस्ताव

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा मतदारसंघातील (Sangali Loksabha Constituency) जागेचा तिढा सुटला असला तरी काँग्रेसच्या (Congress) विशाल पाटील (Vishal Patil) हे नाराज झाले आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी ते इच्छूक होते. परंतु, शिवसेनेच्या (Shivsena UBT) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली. यावरून, विशाल पाटील आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अश्यातच, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी विशाल पाटील यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवल्याचे समोर आले आहे.

विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील (Pratik Patil) यांनी प्रकाश शेंडगे यांची मुंबईत त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी सांगलीत जत पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. यावेळी, ‘पुन्हा एकदा पाटील घराणे आणि शेंडगे घराणे एकत्र आले तर नक्कीच सांगली लोकसभेसोबतच सांगली जिल्ह्यातील महत्वाच्या संस्थादेखील ताब्यात येतील,’ असा विश्वास प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला.

काय आहे जत पॅटर्न?

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जत विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसची हक्काची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन भाजपच्या प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे प्रकाश शेंडगे निवडून आले होते. आता तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संजय शेंडगे यांना पाठिंबा देऊन पुन्हा ‘जत पॅटर्न’ राबवावा असा प्रस्ताव प्रकाश शेंडगे यांनी मांडला आहे. याबाबत प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले, “शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांना सेनेचे कॅडर नसल्यामुळे त्यांना मतदान होणार नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आम्ही त्यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक या सर्व निवडणूकांमध्ये पाठिंबा देऊ.”

हे ही वाचा:

Vishal Patil यांच्या अडचणीत वाढ ! Sangali तुन स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात
 
PM NARENDRA MODI: कितीही हल्ला केला तरीही देशाचा पंतप्रधान मागे हटणार नाही
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version