Thursday, May 16, 2024

Latest Posts

Vishal Patil यांच्या अडचणीत वाढ ! Sangali तुन स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात

विशाल पाटील यांना आणखी एक धक्का बसला असून सांगलीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशभरात धामधूम सुरु आहे. राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपल्या ४८ जागांचा फॉर्म्युला जाहीर केला होता. त्यात वादग्रस्त सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangali Loksabha Constituency) काँग्रेसला (Congress) वगळून शिवसेना उबाठा पक्षाला (Shivsena UBT) उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) आणि विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) नाराज झाले होते. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अश्यातच विशाल पाटील यांना आणखी एक धक्का बसला असून सांगलीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) देखील निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडे (Mahesh Kharade) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, विशाल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कारण, २०१९ साली विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. यावेळी जर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर त्यांना स्वाभिमानाची साथ मिळू शकणार नाही.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ऊस आंदोलन झाले तेव्हा जवळपास ५०० किमी पदयात्रा काढली. २० ते २२ दिवस हि पदयात्रा सुरु होती. तासगाव कारखाना, डोंगराई कारखाना, नागेवाडी कारखाना यांनी थकलेली ऊसबिले आंदोलन करून शेतकऱ्यांना मिळवून दिली होती. गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी पक्षाचाच जिल्हाध्यक्ष तसेच कणखर नेतृत्व म्हणून महेश खराडे यांनी चांगलं काम केलं आहे. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने हि जागा लढवली होती. जवळपास साडे तीन लाख मते आम्हाला मिळाली होती. यावेळी, त्यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील, असा विश्वास आहे.”

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss