Sanjay Raut म्हणजे वाया गेलेली केस, Gulabrao Patil यांची खरमरीत टीका

सध्या सर्वत्र उमेदवारांच्या प्रचारसभा चालू आहेत. एक मागे एक असे सगळेच उमेदवार प्रचारामध्ये गुंतले आहेत. काल संजय राऊतांची जळगाव येथे सभा झाली.

Sanjay Raut म्हणजे वाया गेलेली केस, Gulabrao Patil यांची खरमरीत टीका

सध्या सर्वत्र उमेदवारांच्या प्रचारसभा चालू आहेत. एका मागे एक असे सगळेच उमेदवार प्रचारामध्ये गुंतले आहेत. संजय राऊतांची जळगाव येथे सभा झाली. झालेल्या सभेमध्ये संजय राऊतांनी शिवीचा वापर करत भाजपच्या शिंदे गटावरती टीका केली. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच गदारोळ निर्माण झाला आहे.

संजय राऊतांनी केलेल्या या टीकेवर गुलाबराव उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत म्हणजे वाया गेलेली केस, त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करायला हवं. आम्हाला शिवी देताय तुम्ही पण आमच्याबरोबर युती केली होती, मग हीच शिवी तुम्हालाही लागू होते. पण आम्ही अश्या भाषेचा वापर करणार नाही कारण आमच्यावरती बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण त्यांनी जर अंगावर घेतले आहे तर आम्ही देखील शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही.”

पुढे ते म्हणाले, “संजय राऊतांनी चांगल्या भाषेचा प्रयोग केला नाही. आमची खान्देशातील भाषा तर अजून खालच्या दर्जाची आहे. प्रचाराची वेळ येईल तर आम्ही त्यांना दाखवू. बाळासाहेबांनी पानटपरीवाल्यांना आमदार, मंत्री केले. पानटपरीवर बसून आमदार होता येत नाही, त्यासाठी मेहनत केली, आंदोलने केली, अंगावर केसेस घेतल्या. २४ तास जनतेची सेवा केली. पण तू काय केले. अग्रलेख लिहला आणि आमच्या जीवावर दोनदा खासदार झाला. तू बिना मेहनतीचे धान्य पिकवतोय.” अशी टीका गुलाबरावांनी केली.

पुढे गुलाबराव म्हणाले, “संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या गळ्यातले ताईत म्हणून ओळखले जातात. म्हणून त्यांनी व्यवस्थित भाष्य केले पाहिजे. जळगाव च्या भूमीत तुम्ही जे बोलून गेला त्यापेक्षा वाईट आम्ही बोलू शकतो. पण बाळासाहेबांच्या संस्कारांमुळे आम्ही गप्प बसलो आहोत. पण तुम्ही जर अंगावर आलंच आहेत तर शिंगावर घेणारच ना. अशी टीका गुलाबरावांनी संजय राऊतांवर केली.

हे ही वाचा:

Exclusive Arvind Sawant: Uddhav Thackeray यांचं मला कौतुक वाटतं, कारण…

मराठी मतदारांना BJP ठरवणार कवडीमोल, उमेदवार निवडीचा काय आहे झोल?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version