Monday, May 6, 2024

Latest Posts

Exclusive Arvind Sawant: Uddhav Thackeray यांचं मला कौतुक वाटतं, कारण…

दक्षिण मुंबईत ज्याचा खासदार त्याचा केंद्रात पंतप्रधान होतो, त्यामुळे या निवडणुकीत मी नक्की जिंकणारच असा आशावाद अरविंद सावंत यांनी टाईम महाराष्ट्र या वेबपोर्टलचे संपादक राजेश कोचरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. दक्षिण मुंबईत सेनेच्या अरविंद सावंत यांच्यासमोर महायुतीला तगडा उमेदवार देता आलेला नाही. या मतदारसंघात ४३ टक्के मराठी मतदार आहेत. त्यांच्या मनात भाजपच्या संभाव्य उमेदवारांबद्दल अढी आहे. त्याबद्दल आणि अरविंद सावंत यांच्या राजकीय मतांबद्दल काही प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून टाईम महाराष्ट्रकडून उलगडा करण्यात आला आहे.

मराठी मतदारांचा दक्षिणेत करिश्मा दाखवणाऱ्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, असे मत व्यक्त केले. यासोबतच, अरविंद सावंत यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. कोविडमध्ये बाकीचे लोकं कुठे होते? आता दिमाखाने फिरणाऱ्या लोकांनी तेव्हा काय केलं? असा सवाल विचारत, मी निर्भयपणे सर्वकाही केलं, मास्क दिले, पीपीई किट दिले. स्वतःची काळजी केली नाही. प्रत्येकाला भेदभाव न करता मदत केली. शिवसेना सर्वत्र पोहचलेली आहे. आपल्या बुद्धिमत्तेला मर्यादा नसते. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आता उभे आहेत, ते सर्व काही कसं सांभाळतात माहिती नाही, पण मला त्यांचं कौतुक वाटतं, असे अरविंद सावंत म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्फूर्ती-ऊर्जा त्यांच्यात आहेत. बाळासाहेबांसारखा हिमालय आता जगात नाहीयेत पण त्यांची शिकवण घेऊन ते नसतांना इतक्या प्रचंड ताकदीने जगून ते जगण्याचं सामर्थ्य, संघर्षाचा आत्मविश्वास त्यांच्यात कसा येतो, याचं मला आश्चर्य वाटत असल्याचे अरविंद सावंत यांनी मुलाखतीत सांगितले.

हे ही वाचा:

कच्च्या केळीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Amit Shah यांचा Uddhav Thackeray यांना टोला, दिला जय भवानीचा नारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss