एवढ्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू, बच्चू कडूची शिंदे-फडणवीस सरकारवर मिश्किल टीका

यंदाच्यावर्षी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं सूचक विधान केलं आहे. या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

एवढ्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू, बच्चू कडूची शिंदे-फडणवीस सरकारवर मिश्किल टीका

सध्या महाराष्ट्रातील नेते त्यांच्या पक्षावर नाराज आल्याचं चित्र पाहायला. काही दिवसापूर्वी मनसेचे नेते वसंत मोरे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती,तर रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांनी त्यांना विश्वासात न घेते जोगेंद्र कवाडे यांच्या सोबत युती केल्यामुळे नाराजी व्यक्त केली तर पंकजा मुंडे सुद्धा भाजपवर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच बरोबर माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज होताना दिसत आहेत. जेव्हा शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं, त्यावेळी मंत्री न पद मिळाल्याने त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. दरम्यान, आता त्यांनी यंदाच्यावर्षी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं सूचक विधान केलं आहे. या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिन्याहून जास्त कालावधी लोटला आहे. पण अद्याप सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून रोज मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. अशातच बच्चू कडू यांनी यावर भाष्य केलं आहे. जेव्हा मी सत्ताधारी पक्षातील आमदारांशी बोलत असतो, तेव्हा २०२४ नंतरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं त्यांना सांगत असतो”, असं बच्चू कडू म्हणाले.

माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाचं मत्रीपद तुमच्याकडे कधी येणार आहे?, असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले,“मला वाटतं, हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा. आम्ही सर्व आमदार जेव्हा एकत्र बसतो, तेव्हा मी त्यांना सांगत असतो की, २०२४ नंतरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.” त्यानंतर त्यांना ‘मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाबाबत विचारलं असता, बच्चू कडू मिश्किल अंदाजात म्हणाले की,“एवढ्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू,”अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार वर करतानाच ते म्हणले,”आम्ही सगळ्या आमदारांनी आता आमची मानसिकता तयार करून ठेवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात तुम्ही डोकं नका लावू,काहीतरी काम करा”,असही बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा:

शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

राशी भविष्य, १० जानेवारी २०२३, आर्थिक बाबतीत केलेली गुंतवणूक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version