Sunday, May 5, 2024

Latest Posts

शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आठ पैकी एका मुद्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ यासंदर्भात निर्णय देणार आहेत. ठाकरे गटाने केलेल्या ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण द्यावे, या मागणीवर निर्णय होणार आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये बंड झाला झाला आणि सत्तांतर झाले. तेव्हा पासून शिवसेनेचे दोन गट झाले. त्यानंतर शिवसेना कुणाची यावरून सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नक्की कोणाची?, याचा निर्णय आज जाहीर होणार आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आठ पैकी एका मुद्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश वाय.एस.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ यासंदर्भात निर्णय देणार आहेत. ठाकरे गटाने केलेल्या ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण द्यावे, या मागणीवर निर्णय होणार आहे. आज दुपारी १२ नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे, हे लेखी स्वरूपात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच संबंधित प्रकरणातील सर्व याचिकादारांनी एकमेकांना त्या मुद्यांची टिप्पनी लेखी स्वरुपात देण्याचे ही न्यायालयाने सांगितले होते.

राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल विविध मुद्यांवर सुनावणी करण्यासाठी ठाकरे गटाने या खटल्यासाठी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठपुढे सुनावणी करावी, अशी मागणी केली आहे. त्यात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईचा प्रमुख मुद्दा आहे. विधानसभेचे पीठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आजच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सत्तासंघर्षाप्रकरणी निवडणूक आयोगात निर्णय होणार आहे. निवडणूक आयोगात दोन्ही बाजूंनी कागदपत्रं सादर केलेली आहेत, त्यामुळे आता प्रत्यक्ष सुनावणीला आणि युक्तीवादांना कधी सुरुवात होतेय याचं उत्तर आज निवडणूक आयोगाकडून मिळेल. धनुष्यबाण कुणाचा?, याचं उत्तर याच आयोगाच्या लढाईतून मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा असेल यात शंका नाही. सुप्रीम कोर्टातलं प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं तर परिणामी ही केस लांबण्याचीही शक्यता आहे.

हे ही वाचा:

राशी भविष्य, १० जानेवारी २०२३, आर्थिक बाबतीत केलेली गुंतवणूक…

चविष्ट पदार्थ खायची आवड आहे? तर बनवा घरच्या घरी हे चविष्ट “मेथीचे मुटके”

तुम्हाला हँडवॉश घरी बनावता येतो का ? तर पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss