Saturday, May 18, 2024

Latest Posts

राशी भविष्य, १० जानेवारी २०२३, आर्थिक बाबतीत केलेली गुंतवणूक…

मनात शुद्ध भावना निर्माण होत राहील तसेच निखळ प्रेमाचा आनंद देखील घेता येईल. तुमच्या अमोघ वाणीने उपस्थित उपदेशून केलेले प्रबोधन समाजाला दिशा दर्शक ठरेल.

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक , गुरुजी, ठाणे

मेष : आज तुमच्या मनात शुद्ध भावना निर्माण होत राहील तसेच निखळ प्रेमाचा आनंद देखील घेता येईल. तुमच्या अमोघ वाणीने उपस्थित उपदेशून केलेले प्रबोधन समाजाला दिशा दर्शक ठरेल. तुम्ही केलेलं व्यवस्थापन देखील कौतुकास्पद असेल. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आजची ग्रहस्थिती तुम्हाला प्रेरित करू शकेल. विद्यार्थी दशेतील लोकांना बौद्धिक पातळीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
स्त्रीयांसाठी : तुमचा हेतू सरळ असेल.

वृषभ : आज काही लोक तुमच्या भावनेशी खेळल्याने वेदना जाणवेल. कौटुंबिक जीवनासाठी वेळ देण्याची आवश्यकता आहे. जागा विषयक व्यवहार सुरळीत करून घेण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या नोकरीत सहकाऱ्यांचा उत्तम सहयोग लाभेल. मित्र परिवाराकडून मनाला दिलासा मिळेल अशी बातमी ऐकायला मिळेल. न्यायालयीन क्षेत्रात आपण कार्यरत असाल तर अपेक्षित प्रक्रिया सहजतेने पूर्णत्वास न्याल.
स्त्रीयांसाठी : कमजोरी जाणवेल.

मिथुन : तुम्ही तुमच्या स्वतंत्र बाण्याने जगण्यासाठी प्रयत्न कराल. भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्व द्याल. अनेकविध बाबतीत बनत चाललेली असंतुष्टता तुम्हाला मानसिक दुर्बलतेकडे घेऊन जाण्याची शक्यता आहे. आयुष्यातील ध्येयाची स्पष्टता असावी. उत्तम गुण आणि प्रदीर्घ अनुभव यांची सांगड घालावी. एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.
स्त्रीयांसाठी : तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल.

कर्क : आजचे तुमचे कार्य प्रशंसनीय असेल. तुमच्यातील उत्तम गुणांचे प्रदर्शन आज अपेक्षित आहे. वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतल्यास आपण यशस्वी व्हाल. न्यायालयात अनेक बाबी स्पष्टपणे मांडून आपली बाजू भक्कम करू शकाल. आर्थिक बाबतीत केलेली गुंतवणूक व्यवहार्य ठरेल. भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय तुमच्या हिताचा असेल. डोळ्याचे विकार असल्यास त्याबाबत विशेष काळजी घ्यावी.
स्त्रीयांसाठी : पारिवारिक स्नेहसंबंध सुधरवण्यात तुमची भूमिका महत्वाची ठरेल.

सिंह : आजच्या दिवसाचा पूर्वार्ध द्विधा मनस्थितीचा असेल मात्र दिवसाच्या बदलत्या स्थितीत तात्काळ भानावर येऊन कामकाजाला गती द्याल. तुमचे भागीदार तसेच राजकारणातील सहयोगी तुमच्यासाठी दूत म्हणून कार्य करतील. अनेक विषयावर चर्चा केल्याने समस्या हल करण्यासाठी मार्ग सापडतील. गेल्या काही काळापासून आलेले नैराश्यातून बाहेर पडण्यासारखे वातावरण तयार होईल.
स्त्रीयांसाठी : वागण्या-बोलण्यात सकारात्मकता असावी.

कन्या : उत्तम आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून तुमची प्रतिमा निर्माण होणारा आजचा दिवस आहे. तुम्ही स्वतःला कर्तृत्वाने सिद्ध कराल. बौद्धिक पातळीवर घेतलेला निर्णय अथवा मांडलेले विचार हे व्यावहारिकच असतील. अर्थार्जनासाठी केलेल्या प्रयत्नांस यश मिळेल. औद्योगिक क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीबाबत थोडी साशंकता जरी असली तरी चिंतेचे कारण नाही. दूरचे प्रवास टाळावेत.
स्त्रीयांसाठी: तुमच्या कलागुणांची सकारात्मक चर्चा होईल.

तुला : आज तुम्हाला लाभाचा दिवस आहे. अनेक विषयांचे विविध पैलू उकलून तो विषय धसास लावाल. तुमच्या लेखणीला अधिष्ठान प्राप्त होईल. आदर्श घटनेचे उत्तम लेखन करून लोकांपर्यन्त सामाजिक संदेश पोहोचण्यासाठी केलेल्या प्रयत्नास उत्तम प्रतिसाद मिळेल. व्यवसायात भावनिक झाल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेष करून दलाली करण्याऱ्या व्यवसायिकांनी याची काळजी घ्यावी.
स्त्रीयांसाठी : मनमोहक वस्तूंचे आकर्षण निर्माण होईल.

वृश्चिक : दिवसाची सुरुवात मंद गतीने होत असली तरी थोड्याच वेळात कामकाजाला गती प्राप्त होईल. तुमचे मत परखडपणे मांडल्याने ठोस आणि धोरणात्मक निर्णय घेण्यातील अडथळे दूर होतील. तुमचे कार्य इतरांसाठी आदर्श बनेल. त्यातून मिळालेले मार्गदर्शन इतरांना जीवनासाठी महत्वपूर्ण बदल घडविण्यास मदतगार ठरू शकेल.
स्त्रीयांसाठी : स्थावर इस्टेटीच्या व्यवहारात वाटणी मिळेल.

धनु : सामाजिक प्रबोधन करणे – वक्तृत्व कलेत सहभागी होणे-विविध प्रतियोगितेत उत्तम सादरीकरण करणे अशाप्रकारची दिनचर्या राहील. तुमच्या कलागुणांना सामाजिक अधिष्ठान लाभेल. तुम्ही प्रेषित केलेला सामाजिक संदेश समाजहित आणि माध्यमाची प्रतिष्ठा वाढविणारा ठरेल. तुमची व्यावहारिक गणित अचूक जुळतील. नवीन उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करीत असाल तर आज तुमच्या विचारांना अधिक गती प्राप्त होईल.
स्त्रीयांसाठी : तुमची आदर्श जोवन पद्धती इतरांना प्रेरणादायी ठरेल.

मकर : आजचा दिवस तुमच्या विचारांच्या विरोधी मत प्रवाहाचा असेल. तुम्ही तुमचे मानसीक संतुलन सांभाळण्याचा देखील विचार करायला हवा. अति दुर्गम भागातील प्रवास टाळावा. हिंस्र पशूंची छेडछाड करणे तापदायक ठरू शेकेल. तुमची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या दोन्ही विषयाची जान ठेवूनच वर्तन केल्यास तुम्हाला दिलासा मिळू शकेल. कोणत्याही बाबतीत मौन राखणे हा एकच उपाय तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल.
स्त्रीयांसाठी : सर्वांचे मत ऐकून घेणे लाभाचे ठरेल.

कुंभ : तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. मंगल कार्याविषयीची बोलणी सुरु होतील. त्यातून दोन्ही बाजूंची सकारात्मकता कार्यास गती देणारी असेल. तुमचे स्नेहीजन तुम्हाला प्रोत्साहन देतील. व्यापार उद्योगात भागीदारीतील व्यवसाय उन्नती करू शकतील.भागीदारांवरील विश्वास अधिक दृढ होऊन प्रगतीकडे वाटचाल सुरु कराल. त्वचेचे विकार असल्यास विशेष काळजी घ्यावी.
स्त्रीयांसाठी : माहेरच्या मंडळींकडून उत्तम सहकार्य लाभेल.

मीन : आजचा दिवस तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण उलाढालीचा ठरू शकेल. कर्ज प्रकरणे करून तुम्हाला आर्थिक राशीचा सहयोग प्राप्त होईल. प्राकृतिक कारणाने थोडीफार अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. बौद्धिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयात जर द्विधा निर्माण होत असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊनच पुढील पाऊल उचलणे हितकारक ठरेल.
स्त्रीयांसाठी : अचानक लाभ होतील.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023 मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का बरे उडवले जातात?

नियमित आहारात बीटचा समावेश करा आणि घ्या गुणकारी फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss