Raj Thackeray यांचा पंतप्रधानांना पाठिंबा, दोघंही दिसणार एकाच मंचावर

.लवकरच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर होईल (Shivaji Park Mumbai) असे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पत्रकारांस सांगितले.

Raj Thackeray यांचा पंतप्रधानांना पाठिंबा, दोघंही दिसणार एकाच मंचावर

हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अधिकृतचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कवर मोठी सभा आयोजित केली होती. या सभेस लाखो मनसैनिक उपस्थित होते. यात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली होती. त्याबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन केले होते. आता लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसून येणार आहेत. लवकरच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर होईल (Shivaji Park Mumbai) असे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पत्रकारांस सांगितले. सध्या अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. प्रभाग निहाय बैठका घेण्याचे त्यांचे काम चालू आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीस पाठिंबा दिला आहे. जो कोणी मनसेचा पदाधिकारी पक्षाचे काम करणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल असा आदेशसुद्धा मनसे कडून देण्यात आला आहे.

पुणे दौरा चालू असताना अमित ठाकरेंनी वसंत मोरे यांवर निशाणा साधला. मनसेने लोकसभा निवडणूक न लढण्याचं जाहीर केल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला रामराम केला होता. त्यानंतर ते काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारी पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. आता वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. पुणे लोकसभेची निवडणूक यावेळी चांगलीच रंगणार आहे. तरीही चार दिवसांपूर्वी मोरेंनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगून एकच खळबळ उडवली होती.

Exit mobile version