मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे.

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीनंतर आता महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) अद्याप जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मराठवाड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) फारश्या जागा मिळालेल्या नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरची जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यात एकूण ८ जागा मिळाल्या आहेत. त्यातील ६ जागा भाजपाला मिळणार आहेत. मराठवाड्यात शिवसेनेचे वर्चस्व असूनसुद्धा शिवसेनेला खूप कमी जागा मिळाल्या आहेत. भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह (Amit Shah) हे लोकसभा निवडणुकीपूर्वी संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये सभेचे आयोजन करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यातच आता लोकसभेचे जागेसाठी भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेवर दबाव टाकला जात आहे.भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार ही जागा भाजपासाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी भाजपने बीड, जालना, नांदेड, लातूर या जागेंवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. मराठवाड्यातील आठ पैकी चार जागांवर तर भाजपचे उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जागांसाठी भाजपकडून तयारी केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या शिवसेनेचा खासदार असल्याने शिवसेना आपली जागा सोडायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेनेची मराठवाड्यात मोठी ताकद आहे. तिथे शिवसेनेचा १ खासदार आणि १० आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मराठवाड्यात खूप कमी जागा मिळाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील जागा वाटपावर बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे विधान केले आहे. भाजपचा उमेदवार असेल की शिवसेनेचा असा विचार करण्यापेक्षा, हा विषय प्रतिष्ठेचा विषय करण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला जागा देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हाच महायुतीचा फॉर्म्यूला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

ED ने BJP अध्यक्षांना जेलमध्ये टाकले पाहिजे, Sanjay Raut यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version