Wednesday, May 8, 2024

Latest Posts

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी मोठी घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी मोठी घोषणा केली होती. बारामती मतदार संघातून विजय शिवतारे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र त्यांनी केलेल्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विजय शिवतारे कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभा निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे विजय शिवतारे यांच्या विरोधात असलेल्या सर्व बड्या नेत्यांची भेट घेत आहेत. शिवतारेंनी भोरच्या अनंतराव थोपटे यांच्यानंतर इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची (Harshavardhan Patil) भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.

विजय शिवतारेंनी काही दिवसांआधी भोरच्या अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. अनंतराव थोपटे हे शरद पवार यांचे मागील अनेक वर्षांपासून विरोधक आहेत. त्यातच काही दिवसांआधी ४० वर्षांचे वैर बाजूला ठेवून शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. बारामती मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या विजय शिवतारेंनी अनंतराव थोपटे यांचा पाठिंबा मागितला आहे. विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातील इंदापूर विधानसभेचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांचे सहकारी दत्तात्रय भरणे निवडणूक निवडूण आले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांवर नाराज आहेत. त्यामुळे आता विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत.

विजय शिवतारे अजित पवार यांच्यावर टीका करत म्हणाले, मी उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोक खुश आहेत. अनेक वर्ष ती दाबून राहिली होती. बिहारमध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. अजित पवारांनी या ठिकाणी नेक्सस तयार केलं आहे, गुंडांकडून दम दिला जातोय. त्यामुळे दोन्ही पवार आता नको असं लोकांचं मत आहे. माझा विरोध हा वैयक्तिक नसून पवार या प्रवृत्तीला आहे, असे विजय शिवतारे म्हणाले. महायुतीकडून तिकीट मागितले असून ही जागा सहज जिंकता येईल, असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.

हे ही वाचा:

ED ने BJP अध्यक्षांना जेलमध्ये टाकले पाहिजे, Sanjay Raut यांची मागणी

IPL 2024 च्या लढतीत Chennai Super Kings ने मारली पहिली बाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss