Thursday, May 9, 2024

Latest Posts

ED ने BJP अध्यक्षांना जेलमध्ये टाकले पाहिजे, Sanjay Raut यांची मागणी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बेकायदेशीरपणे आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आल्याचा हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर, बदल्याची भावना आणि घाबरून खोट्या केसमध्ये अटक केली, हे सर्वांना माहीती आहे. हे विश्वगुरूही जाणून आहेत. दिवसेंदिवस त्यांना भीती वाटत आहे. सध्या जंगलराज सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. तिथे भाजप ५ च्या वर आले नाही. केजरीवाल जेलमध्ये राहून देखील काम करू शकतात. केजरीवाल यांना लोकांनी निवडून आणले. ईडी (ED), सीबीआय (CBI) यांनी नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल  नागरिक त्यांचे मत सांगतील. असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. 

कंसाला ज्यांची-ज्यांची भीती होती, त्या सर्वांनात्यांनी तुरुंगात टाकले होते. अगदी देवाला देखील तुरुंगात टाकण्यात आलं होतं. शेवटी त्याच तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध करण्यात आला. आमच्या कंस मामाला भीती वाटत आहे या सर्वांची, त्यामुळे तुरुंगात टाकण्यात येत आहे. ईडीने केजरीवाल यांना जेलमध्ये न पाठवता भाजप अध्यक्षांना जेलमध्ये टाकले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. 

अण्णा हजारे यांना पहिले जागा करा, कुठे आहेत ते ? मला माहित नाही ते कुठे असतात. एकेकाळी त्यांचे आंदोलन व्हायचे. ते आता कुठे हरवले आहेत ते मला माहिती नाही. आम्ही दिल्लीतील प्रमुख नेत्यांशी आणि नाना पटोले यांच्याशी सांगलीच्या उमेदवाराबाबत चर्चा करणार आहोत. काय असतो तो विडा हिंदुत्वाचा? कोणत्या पानाच्या गादीवर भेटतो ते  त्यांना विचारा, असे राऊत म्हणाले. या महाराष्ट्रामध्ये अफजलखानाने देखील विडा उचलला होता. त्या विड्याचा काही भाग शिंदेंकडे असेल. त्यांच्या पानाचा विडा कोणत्या गादीवरती भेटतो दिल्लीतील आणि गुजरातमधील? त्यांना एकदा विचारून घ्या, असे संजय राऊत म्हणाले. उद्या ते छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील वारसदार ठरवतील. ते कोणाचेही वारसदार ठरू शकतात. हिंदुहृद्यसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा भारतीय जनता पक्षाने सांगण्यातइतके आम्ही खाली घसरलो नाही. आपल्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी हिंदुहृद्यसम्राट पक्षप्रमुख यांचा पक्ष फोडतात आणि महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न बघतात त्यांच्याकडून वारसा हे काय आम्ही शिकायचं? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्नावर बोलताना उपस्थित केला.

हे ही वाचा:

Mahavikas Aghadi चा निर्णय तरी काय? Vanchit सोबत की Vanchit शिवाय?

IPL 2024 च्या लढतीत Chennai Super Kings ने मारली पहिली बाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss