BJP काम करो अथवा न करो,आम्ही… Gulabrao Patil यांचे मोठे वक्तव्य

BJP काम करो अथवा न करो,आम्ही… Gulabrao Patil यांचे मोठे वक्तव्य

शिवसेना एकनाथ शिंदे (Shivsena) गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी माध्यमांसमोर व्यक्त होत , “आमच्या सरकार मध्ये केलेल्या विकास कामांवर आम्हाला लोक मतदान करणार आहेत,” असे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे मंत्री गुलाबराब पाटील (Gulabrao Patil) यांनी,”‘भाजपा काम करो अथवा न करो,आम्ही इमानदारीने काम करणार आहोत,” असे म्हंटले आहे.

राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “विरोधक आंधळे आहेत, त्यांना विकास दिसत नाहीये, गेल्या दहा वर्ष विरोधक आरोप करत आहेत. त्यांना शिवसेना प्रमुखांचे नाव घेताना लाज वाटायला पाहिजे. अयोध्यामधील भव्य राम मंदिर त्यांना दिसत नाहीये. ३७० कलम रद्द झालेलं त्यांना दिसत नाहीये. स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान त्यांना दिसत नाहीये. देशात एयरपोर्ट झालेलं दिसत नाहीये, मेट्रोचं झालेलं काम, नॅशनल हायवे झालेले दिसत नाहीये. देशाची अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरुन पाचव्या स्थानावर आली आहे. त्यामुळे विरोधक आंधळे झाले आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींची त्यांना जाणीव नाही आहे. अटल सेतु, कोस्टल रोड किती मुंबई विकासाची काम झाली आहेत पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सरकार मध्ये विकास काम झालेली आहेत. त्यांच मुद्यावर लोक आम्हाला मतदान करणार आहेत. महाराष्ट्रात आम्ही ४५ प्लस जागा जिंकणार आहोत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रीडेवलपमेंटचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या पाच वर्षात तो विषय आम्ही पुर्ण करणार आहोत”

दुसरीकडे महायुतीचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘भाजपा काम करो अथवा न करो,आम्ही इमानदारीने काम करणार आहोत,’ असे म्हंटले आहे. ते म्हणाले, “एका बापाची औलाद आहोत हे भाजपा काम करो अथवा न करो,आम्ही इमानदारीने काम करणार आहोत. जो होगा हमारा नशीब, आमचं काम हे आग विझविणाऱ्या चिमणी सारखा आहे. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकावयचा आहे. कार्यकर्त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. इमानदारीओंके लिए लहर हैं मोदी बेईमानीओंके लिए जहर है मोदी!” असे त्यांनी म्हंटले आहे.

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

“राज ठाकरेंचा देव बदलु शकतो” ;संजय राऊतांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version