Saturday, May 18, 2024

Latest Posts

“राज ठाकरेंचा देव बदलु शकतो” ;संजय राऊतांचा हल्लाबोल

हे जे नवीन मोदी शाहाचं भक्त झालेत ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का याचे आत्मचिंतन करावे.. असे म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली.

काल महायुतीचे रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे(Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी कोकणात जाहीर सभा घेतली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा साधला.”राज ठाकरे मौनी खासदारांचं समर्थन करत आहेत. ही त्यांची मजबुरी आहे.”असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना चांगलंच प्रत्युत्तर दिलं.

“राज ठाकरे यांची काल कोकणात सभा झाली, काल उद्धव ठाकरे देखील कोकणात होते. प्रकल्पांनाविरोध का होत आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातले चांगले प्रकल्प गुजरातला पळवायचे. महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प हे राज ठाकरे यांचे मोदी, शाह यांनी गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विनाश करणारे प्रकल्प आमच्यापाठी मारायचे.आमच्या शेती जमिनीच नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावर कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची.सध्या हे जे नवीन मोदी आणि शहांचे भक्त झाले आहेत ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? हे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे.”अशा शब्दात आयोजित पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली.

पुढे ते म्हणाले की,”तुम्हाला बाक बडवणारे खासदार हवे आहेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे?कुणासाठी नारायण राणे(Narayan Rane) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन कोकणासाठी काय दिवे लावले त्याचा खुलासा वकिली करणाऱ्यांनी करायला हवा.कोकणात नारायण राणे हे पराभूत होत आहेत म्हणुन त्यांचा कावा चालू आहे. ४ जून ला समजेल. राणेंविषयी फार बोलण्याची काही गरज नाही.”असं म्हणत नारायण राणेंना टोला लगावला.

दरम्यान, “बॅरिस्टर नाथ पै जे कोकणातले अत्यंत नामवंत असे खासदार होते आणि पंडित नेहरू त्यांचे भाषण ऐकायला थांबायचे. राज ठाकरेंचा देव बदलु शकतो. राज ठाकरे हे नकली अंध भक्त आहेत. खरं म्हणजे मोदी, शाह यांनी महाराष्ट्राचे जे प्रकल्प पळवून नेले त्यावर नारायण राणे यांनी एकदा तरी तोंड उघडलं का? मुंबईतले प्रकल्प गेले,महाराष्ट्राची लूट चालू आहे. याविषयांवर राज ठाकरे, नारायण राणे या दोघांनी एकदा तरी भाष्य केलं आहे का ?”असा ही सवाल संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विचारला आहे.

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

आज एकमेकांवर टीका करणारे नंतर एकत्र हॉटेलमध्ये जेवतात, Prakash Ambedkar यांची विरोधकांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss