उद्धव ठाकरे हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत, आमदार संजय शिरसाट

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागामध्ये सतत हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील पाहायला मिळत आहेत.

उद्धव ठाकरे हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत, आमदार संजय शिरसाट

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागामध्ये सतत हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत ‘एसआयटी’मार्फत त्यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. मातोश्रीवर झालेल्या २००४ च्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या असे आरोप नितेश राणे यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.

पुढे संजय शिरसाट म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार संजय शिरसाट म्हणाले. त्यामुळे आता राजकीय वातावरण आणखीच पेटेल. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते की मुस्लिम भागामध्ये हत्यारे नेऊन हल्ले करा. ज्यामुळे हिंसाचार होईल. १९९५ आणि १९९७ मध्ये हिंसाचाराच्या घडलेल्या घटनांमुळे सत्ता मिळाली होती त्यामुळे पुन्हा असे करून २००४ मध्ये असे काही घडवून सत्ता मिळवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता. आता उद्धव ठाकरे यांचे सरकार गेल्यावर पुन्हा असे प्रकार दिसू लागले आहेत. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी सूचना दिल्या आहेत असे शिरसाट म्हणाले.

पुढे संजय शिरसाट म्हणाले की, राज्यामध्ये काही कारण नसताना हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. परंतु याचा आरोप दुसऱ्यावर ढकलण्यासाठी पुन्हा हिंदू एकजूट कशी होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आम्हाला असे वाटत आहे की जे कोणी हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत ज्यांच्यामुळे या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यांची आता एसआयटीमार्फत चौकशी केली गेली पाहिजे असे संजय शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version