कराडमधील तरुणाचे नशीब उजळले, Dream 11 वर जिंकला १ कोटी २० लाख रुपये

Dream11 Winner : कोणाचं नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही. देशात सध्या आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यांचा हंगाम सुरू आहे. अशातच ड्रीम इलेव्हन (Dream11) या प्लॅटफॉर्मवर अनेक क्रिकेट चाहते आपलं नशीब आजमावत असतात.

कराडमधील तरुणाचे नशीब उजळले, Dream 11 वर जिंकला १ कोटी २० लाख रुपये

Dream11 Winner : कोणाचं नशीब कधी उजळेल हे सांगता येत नाही. देशात सध्या आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यांचा हंगाम सुरू आहे. अशातच ड्रीम इलेव्हन (Dream11) या प्लॅटफॉर्मवर अनेक क्रिकेट चाहते आपलं नशीब आजमावत असतात. कोणता संघ जिंकेल, कोणता खेळाडू कशाप्रकारे आपली कामगिरी करून अन्य गोष्टींचा अंदाज येथे लावला जातो. मागील तीन ते चार वर्ष ड्रीम इलेव्हन हा प्लॅटफॉर्म अतिशय लोकप्रिय झाला आहे. देशात क्वचित काही लोक सोडले तर इतर सर्वांनाच क्रिकेटचे भन्नाट वेड आहे. अशातच आपल्या क्रिकेटच्या ज्ञानाचा उपयोग ड्रीम इलेव्हनमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहे. याच ड्रीम इलेव्हन खेळामुळे साताऱ्यातील कराड तालुक्यामध्ये काले टेक गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील सागर गणपतराव यादव (Sagar Yadav) या तरुणाने ड्रीम इलेव्हन खेळात थोडे पाढे नाही तर तब्बल १ कोटी २० लाख रुपये जिंकले आहेत.

सागर यादव याला लहानपणापासूनच क्रिकेटचे भन्नाट वेड होते. तसेच तो भारतीय क्रिकेट संघातील माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)  यांचा मोठा फॅन आहे. मागील अनेक वर्षांपासून सागर ड्रीम इलेव्हन या खेळामध्ये आपलं नशीब आजमावू पाहत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे. सागर यादव याने निवडलेल्या संघाला रँकिंग मिळाले आणि १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस सागर याला प्राप्त झाले. योग्य अभ्यास करून खेळल्यामुळेचं यश मिळाल्याचे सागर याने यावेळी सांगितले.

१ कोटी २० लाख रकमेमधील टी डी एस वजा करून ८४ लाख रुपये सागर यादव यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सागरच्या या कामगिरीनंतर काले टेक गावात जल्लोष करण्यात आला. त्याच्या या कामगिरीबद्दल सागरच्या मित्रमंडळीकडून आणि नातेवाईकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.

हे ही वाचा : 

एमसीए(महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशन)ने 22 आणि 23 एप्रिल 2023 रोजी ‘स्टार्ट-अप Uddhav Thackeray Jalgaon Sabah Live, सभेत घुसणाऱ्या घुशी खूप पहिल्या, उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version