Sunday, May 19, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray Jalgaon Sabah Live, सभेत घुसणाऱ्या घुशी खूप पहिल्या, उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना टोला

आज दिनांक २३ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडत आहे.

आज दिनांक २३ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा पार पडत आहे. उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रभर सभत घेत आहेत. आजची ही सभा होण्यापूर्वी पाचोऱ्यात राजकीय वातावरण हे चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. आजच्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आज पाचोऱ्यात बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणले आहेत की, हा सर्व जल्लोष बघून पाकिस्तान ला सुद्धा विचारलं तरी ते सुद्धा सांगतील शिवसेना कोणाची? परंतु आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला सुद्धा कळत नाही. पर्णातू हा त्यांचा दोष पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी अजून ओळखलं नाहीय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच सरकारवर हल्लाबोल हा केला आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, आम्ही सभेत घुसणार. अश्या घुशी आम्ही खूप पहिल्या परंतु अश्या घुशींना बिळातून काढून आपटणार . सभेत घुसणाऱ्या घुशी खूप पहिल्या अस म्हणत सुरुवातीलाच गुलाब राव पाटील यांना टोला लगावला आहे. पाचोऱ्यात बोलतांत आर व पाटील यांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान झालं असं देखील ते म्हणाले. ४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही परंतु एक विश्वासू गेला तरी फरक पडतो. परंतु आज पुतळ्याचं अनावरण करावे लागेल असं कधी वाटलं नाही. वैशाली ताईंसोबत भेटीची आठवण. वैशाली ताईंचा अभिमान. शेतकऱ्यांच्या साठी झटणारे हे घराणे.

तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणले आहेत की आईच्या कुशींवर वर करणारी गद्दारांची औलाद आहे . तसेच ही ढेकणं मारायला तोफेची गरज नाही . या ढेकणांना चिरफण्यासाठी तुमचं बोट पुरेसे आहे . तुमच्या सर्वांच्या मेहनतीचं रक्त पिऊन फुगलेली ही ढेकण आहेत. असं म्हणतं शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. पुलवामा बाबत सत्यपाल मालिकांनी पूर्व सत्य सांगितलं. विमान दिली नाही म्हणून सैनिकांचे जीव गेले. सत्यपाल मालिकांच्या मागे केंद्र सरकारच्या मागे लावली. पुन्हा काश्मीरात जवान मारले गेले पण अमित शहा निवडणुक प्रचारात कर्नाटकात. मलिक यांना काही बोलू नका म्हणून सांगितले. काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडता. यांना भारत मातेचे कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे. २०१४ युती तुटल्याची आठवण. तेव्हा खडसेंच्या गळ्यात युती तोडल्याचॆ खापर टाकले. आज नाव चिन्ह नाही पण जनसागर उसळतोय, शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद. आपल्या लोकांना बाहेर कसे जातील हे भाजप प्रयत्न आणि इतर पक्षातील भ्रष्ट पक्षात घेतात. संजय राऊतांचे कौतुक. नितिन देशमुखांची परत येण्याची आठवण. राजन साळवींना त्रास देणे सुरु आहे, वैभव नाईक जे माझ्या सोबत त्यांची छळवणूक ईडी सीबीआय. या एकदाचे जेल भरोच करु. आव्हाने कसले देता नामर्दपणा करतायत. राहुल गांधींबाबत पण तेच त्रास देणे सुरु आहे.

मिंधे सरकारने काय दिलय? मी घरीबसून जे सरकार चालवल ते तुम्ही वणवण फिरुन पण तुम्ही करु शकत नाही. घराणेशाहीत पण एक परंपरा असते. तुम्ही म्हणता फकीर पण तुम्ही निघून जाल पण जनतेचे काय? वैशालीताई लढण्यासाठी माझ्याकडे. वैशालीताईंच्या पाठीशी तुम्हाला राहावे लागेल. न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी तीन वर्षात एकतरी प्रसंग मला सांगा की मी हिंदुत्व सोडले. मुख्यमंत्री म्हणून मी घटनेची शपथ घेतली. सर्व धर्मीयांना समान वागणूक दिली. मी हिंदुत्व सोडले नाही सोडणार नाही पण आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे हिंदुत्व काय समजतच नाही. एका राज्यात गोहत्याबंदी एका राज्यात नाही. उलट लोकांना चिरडतायत हे आमचे हिंदुत्व नाही. ठाण्याचा रोशनी शिंदे हल्ला प्रकरणाचा संदर्भ. हे असले यांचे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व नाही. रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले त्यांची तक्रार घेतली नाही. भारतमातेच्या सुपुत्र हे भाजपसाठी नाहीत. वाजपेयींची आठवण. पाचोरा जिवंत आहे. भगव्यावर गद्दारांचा नाही. ज्याचे स्वतःचे काही नाही तेच चोरी करताहेत. खारघरच्या दुर्दैवी घटनेची आठवण. सोहळ्याचा हेतूच वाईट. भाजपला आव्हान त्यांनी जाहीर करावे ते मिंधेच्या नेतृत्वात लढणार आहेत का? तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो आग दिसतेय म्हणून निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही. आता निवडणुका लावा मी तयार आहे. मशालाची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल.

अंबादास यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. आज कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडला आहे. मंत्री म्हणतील अरे घरामध्ये पडलाय ना कर गाधी आणि झोप त्याच्यावर. आम्ही कसे कापसाच्या गाधीवर झोपतो? पण तसं नाहीय ते. आपलं सरकार होतं त्यावेळी जागतिक संकट होतं. नैसर्गिक चक्रीवादळही येत होते. पण अशा संकटावेळी सरकारने मदत केली होती की नाही? उलट्या पायाचं सरकार आहे. हे सरकार अवकाळी आलं. हे सरकार म्हणजेच संकट आहे. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर सांगा. एक शेतकरी मला भेटला, कवी आहे. त्यांना मंचावर आणू शकतो. पण कारवाई केली जाते. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पाचोऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका शेतकऱ्याच्या कवीतेच्या काही ओळी बोलून दाखवल्या. झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या जरा आमच्या बांध्यावरती, अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या जरा आमच्या बांध्यावरती, तुमचं सगळं चाललं असेल ओकेमंधी पण आमच्या कापसाला भाव कधी?… उद्धव ठाकरे म्हणाले की, या शेतकऱ्याला मी मंचावर आणलं नाही कारण, हे सरकार त्याच्यावर कारवाई करू शकतं.

तुम्ही चोरलेला धनुष्यबाण आणि मोदींचा फोटो घेऊन या मी माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घेऊन येतो बघू कोण जिंकत. आता निवडणूका लावा आमची तयारी आहे. मी वाट बघत होतो घुसणारे कधी घुसरणार ? ते सभेत घुसण्याची हिम्मत करणार नाहीत असं देखील उद्धव ठाकरे म्हणले आहेत. मी राज्यभर येणार आहे. तुमच्यावर पुढील निवडणुकीची जबाबदारी. महाराष्ट्र पिंजून काढणार गद्दारांची विल्हेवाट. दिवसा सूर्य आग ओकत असतो पण तुमची जी डोकी आहे ती तापली पाहिजेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सांगता केली.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो क

Latest Posts

Don't Miss